भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ४ – ख्रिस्तपूर्व काळ

भारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.


ख्रिस्तपूर्व ८०० ते ३०० म्हणजे सूत्रकाळात मध आणि दही यांचे मिश्रण म्हणजे मधुपर्क वापरला जाई. तिळाची पूड आणि गूळ किंवा साखर घालून पलाला नावाचा पदार्थ बनविला जाई. पुरोडाश नावाची मोठी पोळी करून ती तुपात बुडवलेली असे. अनेक प्रकारचे लाडू बनविले जात. त्याला मोदक म्हणजे मनाला रिझवणारा असं म्हणत. ऋग्वेदाच्या काळापासूनच दुधात शिजवलेला भात उत्तम समजला जाई आणि त्याला क्षीरोपाकमओदन असं म्हणत. याशिवाय दध्योदन, तीलौदन, मांसौदन, धृतौदन असेही भाताचे इतर पकार होते. सातूचाही वापर खूप केला जाई. वेलची, आलं, सुंठ, पिंपळी यासारख्या पदार्थांचा उपयोग चव वाढविण्यासाठी होई.

या काळात नवनवीन अन्नपदार्थांचा आहारात समावेश करण्यात आला. आर्य आणि द्रविड यांच्या अन्न पद्धतीचं रूपांतर उत्तर आणि दक्षिण भारतीय पद्धतीमधे झालं. वेदकाळात दिवसभराच्या अन्न प्राशनाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आणि त्या वेळी पाळण्याचे शिष्टाचारही निशित करण्यात आले.

— डॉ. वर्षा जोशी

## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ४

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*