आजचा विषय इडली भाग एक

आपल्याकडील पदार्थ खूपच व्यनंज मिश्र. त्यांचा इतिहास कुठे सापडेल? इतर प्रांतांतले पदार्थ पाहिले तरी हेच प्रश्न पडतील. पश्चिमेकडे यीस्ट वापरून पाव बनवला गेला तर इकडे इडली- डोशाचे पीठ रात्रभर आंबवले गेले. ते प्रथम कधी आंबवले गेले, इडली-डोशाचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया पहिल्यांदा कशी घडली असेल? असे असंख्य प्रश्न राहतात. इडली हा पदार्थ मूळचा दक्षिण भारतीय म्हणून ओळखला जात असला तरी, इडली हा प्रकार इंडोनेशियातून भारतात आला आहे. तेथे त्याला किडली/ केडली असे म्हटले जाते. भारतात पदार्थांवरूनही श्रेयवाद आहेत. इडलीचे वर्णन कर्नाटकात ९२० जुलिअन कालगणनेत आढळते. तर तमिळ प्रांतात म्हणे इडली १७ व्या शतकात आली. गुजराथ प्रांत यातही मागे नाही. त्यांच्या मते ढोकळा हा पदार्थ दक्षिणेला १०- १२ व्या शतकात तेथे गेला. कारण त्याकाळी सौराष्ट्र प्रांतातील रेशीम व्यापारी महाराष्ट्रमार्गे तेथे जात असत आणि तेव्हाच ढोकळ्याचे इडली या प्रकारात परिवर्तन झाले. अशी इडलीची ही गाथा.

इडलीवरची कविता
एक होती इडली
ती खूप चिडली

तरातरा धावली
सांबारात जाऊन पडली

सांबार होते गरम
इडली झाली नरम

चमचा आला खुशीत
बसला बशीच्या कुशीत

चमच्याने पाहिले इकडेतिकडे
इडलीचे केले तुकडेतुकडे

मुलांनी केली इडली फस्त
इडली झाली होती मस्त!

कवी माहित नाही
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही इडलीचे प्रकार
रागी इडली
मराठीत रागीला नाचणी म्हणतात
साहित्य:- तांदूळ १ वाटी, उडीद डाळ १वाटी, रागी पीठ १ वाटी, मीठ चवीनुसार.
कृती:- उडीद डाळ व तांदूळ वेगवेगळे २-३ तास पर्यंत भिजवत ठेवा. २-३ तासानंतर उडीद डाळ व तांदूळ मिक्सरमधून वेगवेगळे बारीक/मऊसर वाटून घ्या. एका भांड्यात बारीक केलेली उडीद डाळ व तांदूळ घ्या व त्यात रागी पीठ घाला व हे मिश्रण रात्रभर ८-१० तासांसाठी उबदार ठिकाणी आंबवण्यासाठी ठेवून द्या. ८-१० तासानंतर हे मिश्रण त्याच्या पूर्वीच्या आकाराच्या दुप्पट झाल असेल आता हे इडली साठी सारण तयार असेल. या सारणात मीठ घालून कालवून घ्या. इडली पत्राला तेल लावा व त्यात सारण भरा व १२-१५ मिनिटे वाफवून घ्या व चमच्याच्या सहायाने प्रत्येक इडली
काढून सांबार किंवा नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

शेवया इडली
साहित्य:- १ वाटी जाडसर शेवया, १/४ वाटी जाडसर रवा, २ सिमला मिरच्या, १ वाटी दही, १/२ वाटी पाणी, १ चमचा फ्रूट साल्ट, १/२ चमचा साजुक तूप, मीठ चवीनुसार.
फोडणीचे साहित्य:- १ चमचा मोहरी, ८-१० गोड लिंब, ४ मिरच्या लांब लांब काप केलेल्या, १ चमचा तेल.
कृती:- सर्वप्रथम शेवयांचे बारीक बारीक तुकड्यांना सोनेरी होईपर्यंत तुपात भाजून घ्यावे, सिमला मिरचीचे बारीक बारीक काप करावे. इडली तयार करण्या १ तास अगोदर दह्याला पाण्यासोबत मिसळून एकजीव करून त्यात शेवया आणि रवा मिसळून ठेवावे. जेव्हा मिश्रण फुगून येईल तेव्हा त्यात इनो आणि मीठ घालून ५ मिनिट एकाच दिशेत फिरवावे. नंतर या मिश्रणात सिमला मिरची घालून इडलीच्या पात्रात तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओतावे व २० मिनिट कमी आचेवर शिजवावे. गार झाल्यावर त्याचे चार तुकडे करावे. गरम तेलात मोहरी, गोडलिंब आणि हिरवी मिरची घालून फोडणी द्यावी. चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बार्ली व मिक्स मिलेट इडली
बार्ली:- १ वाटी, मिक्स मिलेट(मॉल मध्ये मिळते.) -१ वाटी, उडीद डाळ -१ वाटी, मीठ – चवीनुसार, पातळ तूप – इडलीपात्राला लावायला
कृती:- दुपारी बार्ली व उडीद डाळ भिजत घाला. मिक्स मिलेट वेगळे भिजवा. रात्री बार्ली व उडीद दळून घ्या. मिक्स मिलेट थोडा वेळ मिक्सरमधून फिरवून घ्या. सगळे एकत्र मिसळून व मीठ उबदार जागी ठेवा. सकाळी नेहमीसारख्या इडल्या करा. सकाळी लगेच इडल्या करायच्या नसतील तर लगेच पीठ फ्रिजमध्ये ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

इडली फ्राय
साहित्य:- ६ उरलेल्या इडल्या, तळण्यासाठी तेल, १/४ टिस्पून मिठ, १/२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून चाट मसाला.
कृती:- प्लेन इडली फ्राय बनवण्यासाठी, कढईत तेल गरम करत ठेवावे. प्रत्येक इडलीचे ३ उभे तुकडे करावे किंवा आवडीच्या शेपमध्ये कापावेत. गरम तेलात मिडीयम हाय गॅसवर तळून काढा. इडलीमध्ये आधीच मिठ असल्याने गरज असल्यास थोडे मिठ भुरभूरावे. मसालेदार इडली बनवण्यासाठी
वरील प्रमाणेच इडल्या तळून घ्याव्यात. गरम असतानाच त्यावर थोडे मिठ, तिखट आणि चाट मसाला भुरभूरवून निट मिक्स करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कांचीपुरम इडली
साहित्य:- २ वाट्या उकडा तांदूळ, १ वाटी उडीद डाळ , अर्धी वाटी चणा डाळ, पाव चमचा हिंग, १ चमचा काळी मिरी, १ टी. स्पून जीरे थोडे आले किसून, थोडा कढीलिंब, थोडे काजूचे तुकडे, चवीनुसार मीठ
कृती:- सर्वप्रथम तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे. जीरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला. थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला. आले किसून टाकून पीठ खूप फेटावे. पीठ फेटून ईडली स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*