पास्ता

साहित्य: १ कप होल ग्रेन पेने पास्ता, १/४ कप लाल भोपळी मिरची, छोटे चौकोनी तुकडे, १/४ कप हिरवी भोपळी मिरची, छोटे चौकोनी तुकडे
१/४ टिस्पून लाल तिखट, ३ टेस्पून ऑलिव ऑईल, १ टेस्पून पार्मिजान चिझ, किसलेले, २ चिमूट ओरेगानो, आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स
पास्ता शिजवण्यासाठी मिठ, ३ टेस्पून पास्ता सॉस.

कृती:
१) एका मोठ्या खोल पातेल्यात ५ ते ६ कप पाणी उकळवावे. त्यात मीठ घालून ढवळावे. पाणी उकळायला लागले कि त्यात १ कप पास्ता घालून १५ ते २० मिनीटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळेनुसार शिजवून घ्यावा. शिजवताना झाकण ठेवू नये तसेच मोठ्या आचेवर शिजवावा. त्यामुळे पाणी उतू जाण्याची शक्यता असते म्हणून एकदम खोलगट आणि मोठे पातेले घ्या. तळाला चिकटू नये म्हणून मधेमधे तळापासून ढवळावे.
२) पास्ता शिजला कि एका चाळणीत काढून घ्यावा आणि त्यावर थंड पाणी घालावे. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे.
३) पॅनमध्ये १ टिस्पून तेल गरम करावे, त्यात भोपळी मिरची घालून १/२ ते १ मिनीट परतावे (टीप २). चिमूटभर ओरेगानो, लाल तिखट आणि मिठ घालावे. लगेच ३ टेस्पून पास्ता सॉस घालून लगेच शिजलेला पास्ता घालावा. गॅस मंद ठेवून १/२ ते १ मिनीट निट मिक्स करावे. वाटल्यास पास्ता सॉस वाढवावा. लगेच सर्व्हींग बोलमध्ये काढावे.
सर्व्ह करताना १ चिमूटभर ड्राय ओरेगानो चुरून भुरभूरावा. तसेच पार्मिजान चिझ घालावे आणि पास्ता सर्व्ह करावा.

टीप:
१) रेड चिली फ्लेक्स गरज वाटल्यास तिखटपणासाठी आवडीप्रमाणे घ्यावे.
२) भोपळी मिरची ३० ते ४० % शिजवावी पूर्ण शिजवू नये. भोपळी मिरचीचे तुकडे थोडे करकरीत राहिलेलेच चांगले लागतात.
३) पास्ता शिजताना जर पाणी कमी खुप कमी झाले असेल तर गरजेपुरते पाणी वाढवावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*