सफरचंदाचा हलवा

साहित्य :

१/२ टीस्पून तूप, १/२ कप किसलेले सफरचंद, १/४ कप मावा, ३/४ कप दुध, १/२ टीस्पून साखर, १/४ कप कापलेले अक्रोड, काजू, बदाम तुकडे, व्हॅनिला इसेन्स २-३ थेंब.

कृती :

१ . नॉन-स्टिक कढई मध्ये तूप गरम करा मग त्यात सफरचंद घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटे सारखे हलवत राहा.
२ . आता मावा टाका आणि २-३ मिनिटे हलवा.
३ . नंतर दुध टाकून ७-८ मिनिटे हलवा .
४ . आता साखर आणि कापलेले ड्राय फ्रुट तुकडे टाका. मंद आचेवर ७-८ मिनिटे हलवत राहा जोपर्यत त्यातील पाणी कमी होत नाही.
५ . पाणी आटलं की आच घालावा आणि त्यात आता व्हॅनिला इसेन्स घाला.(व्हॅनिला इसेन्स नसलातर वेलची पूड घाला)

टीप :
सफरचंद कापले असता ते काळे होते तर एक-एक करून किसा आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवले असता काळ होत नाही(कीस करण्यापूर्वी).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*