मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

माडखोलकर, गजानन त्र्यंबक

स्पष्टवत्त*ेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यत्ति*मत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. माडखोलकरांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ सालचा. वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. […]

यशवंतराव चव्हाण

इंग्रजी चौथीचा वर्ग. जाणिवेचे आकलन नुकतेच व्हायला लागले होते. आयुष्यातील आकांक्षा, महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागले होते. एक दिवस वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, ‘‘तू कोण होणार रे ?’’ प्रत्येक विद्यार्थी उठून उत्तर देत होता. कोणी सांगितलं, ‘‘टिळक’’ कोणी ‘‘डॉक्टर’’ तर कोणी ‘‘कवी’’ पण त्यात एक मुलगा म्हणाला, ‘‘मी यशवंतराव होणार !’’आत्मविश्वासाची, आत्मप्रत्ययाची जाणीव इतक्या लहान वयात ज्यांना झाली होती ते यशवंतराव चव्हाण !
[…]

कर्वे, इरावती

समाजशास्त्र विषयातील संशोधक, मानववंश शास्त्राच्या एक तज्ज्ञ विचारवंत जगन्मान्य विदुषी, ललित निबंध लेखिका अशी कर्तृत्वान महिला म्हणजे इरावती कर्वे. […]

मेश्राम, केशव तानाजी

७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असणारे केशव तानाजी मेश्राम यांचा जन्म २४ नोव्हेंबर, १९३७ रोजी अतिशय गरीब कुटुंबात झाला. बालपण अत्यंत कष्टात गेले. […]

देशपांडे, कुसुमावती

समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. […]

नातू, मनमोहन

उत्कट भावगीतकार आणि बंडखोर कवी म्हणून जनसामान्यांच्या मनावर मोहिनी घालणारे लोककवी मनमोहन नातू यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण ‘लोककवी मनमोहन’ या नावानेच ते महाराष्ट्राला माहीत आहेत. […]

देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण (पुलं)

महाराष्ट्राचे ‘लाडके व्यक्तिमत्त्व’, ‘महाराष्ट्राचे आनंदयात्री’, ‘महाराष्ट्राचे भूषण’, ‘महाराष्ट्राचा अष्टपैलू कलावंत’ असा महाराष्ट्राचा अभिमान असणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.
[…]

सरदेसाई, रियातसरकार

रावसाहेब, रावबहादुर, पद्मभूषण (१९५७), पुणे विद्यापीठाची डी. लिट. पदवी इत्यादी अनेक मान-सन्मान ज्यांना लाभले ते गोविद सखाराम सरदेसाई म्हणजेच ‘रियासतकार सरदेसाई’ यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या गावी १७ मे १८६५ साली झाला. […]

शंकर नारायण (शन्ना) नवरे

नाटककार, कादंबरीकार, कथाकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले शंकर नारायण नवरे. शंकर नारायण नवरे हे नाव शन्ना म्हणूनच सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. २१ नोव्हेंबर १९२७ रोजी त्यांचा जन्म मुंबईत झाला. […]

1 54 55 56 57