मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

सरदेसाई, रियातसरकार

रावसाहेब, रावबहादुर, पद्मभूषण (१९५७), पुणे विद्यापीठाची डी. लिट. पदवी इत्यादी अनेक मान-सन्मान ज्यांना लाभले ते गोविद सखाराम सरदेसाई म्हणजेच ‘रियासतकार सरदेसाई’ यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या गावी १७ मे १८६५ साली झाला. […]

शंकर नारायण (शन्ना) नवरे

नाटककार, कादंबरीकार, कथाकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले शंकर नारायण नवरे. शंकर नारायण नवरे हे नाव शन्ना म्हणूनच सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. २१ नोव्हेंबर १९२७ रोजी त्यांचा जन्म मुंबईत झाला. […]

शिरीष व्यंकटेश पै

कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणार्‍या लेखिका शिरीष पै. ‘गेल्या दहा हजार वर्षांत असं व्यक्तिमत्त्वं झालं नाही’ अशा व्यक्तिमत्त्वाच्या आचार्य अत्रे यांची शिरीष पै ही कन्या. […]

गजानन दिगंबर माडगूळकर

अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गीतरामायणा सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी! […]

सरदेशमुख, त्र्यंबक विनायक

साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि कवी असलेल्या त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे २२ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अक्कलकोट येथे झाले. […]

गुरुनाथ आबाजी (जीए) कुलकर्णी

माणसाच्या वाट्याला येणारे सुखदुःख, राग, लोभ, आनंद, निराशा, यश, अपयश या सगळ्यामध्ये गुंडाळले गेलेले माणसामाणसामधील संबंध त्यातून ताण निर्माण करणारे मानवी विकार आणि आतक्र्य नियतीचे खेळ, त्यातून येणारी अर्थशून्यता या सगळ्याचा प्रत्यय देणारी कथा म्हणजे जी. एं. ची कथा. असा आगळावेळा कथाकार महाराष्ट*ाला मिळाला हे महाराष्ट्राचं भाग्यच. जी. ए. कुलकर्णींचा जन्म तालुका चिपोडी येथील एकसंबा या गावी १० जुलै १९३२ साली झाला. […]

माडखोलकर, गजानन त्र्यंबक

स्पष्टवत्त*ेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यत्ति*मत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. माडखोलकरांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ सालचा. वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. […]

यशवंतराव चव्हाण

इंग्रजी चौथीचा वर्ग. जाणिवेचे आकलन नुकतेच व्हायला लागले होते. आयुष्यातील आकांक्षा, महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागले होते. एक दिवस वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, ‘‘तू कोण होणार रे ?’’ प्रत्येक विद्यार्थी उठून उत्तर देत होता. कोणी सांगितलं, ‘‘टिळक’’ कोणी ‘‘डॉक्टर’’ तर कोणी ‘‘कवी’’ पण त्यात एक मुलगा म्हणाला, ‘‘मी यशवंतराव होणार !’’आत्मविश्वासाची, आत्मप्रत्ययाची जाणीव इतक्या लहान वयात ज्यांना झाली होती ते यशवंतराव चव्हाण !
[…]

कर्वे, इरावती

समाजशास्त्र विषयातील संशोधक, मानववंश शास्त्राच्या एक तज्ज्ञ विचारवंत जगन्मान्य विदुषी, ललित निबंध लेखिका अशी कर्तृत्वान महिला म्हणजे इरावती कर्वे. […]

1 54 55 56 57