मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

प्रेमानंद गज्वी

प्रेमानंद गज्वी हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद गज्वी यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं. […]

प्रा. रंगनाथ पठारे

प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. […]

प्रा. अशोक केळकर

व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ अॅन्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली. […]

प्रवीण तरडे

अनेक चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’, ‘मुळशी पॅटर्न’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. […]

प्रमोद नवलकर

सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले. […]

प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार सदैव नव्या पिढीबरोबर वाटचाल करीत राहिले याचे कारण ते स्वत: अखेरपर्यंत वृत्तीने ताजे-टवटवीत नि तरुण होते. प्रबोधनकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे कर्तृत्व गाजवले ते मोलाचे. […]

प्रदीप निफाडकर

‘द हिंदू’ या निष्पक्ष दैनिकाने ज्यांचा उल्लेख ‘गझलसम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार,’ असा केला, झी चोवीस तास या वाहिनीचे व झी मराठी दिशा या आठवडापत्राचे मुख्य संपादक विजयजी कुवळेकर ज्यांना ‘भट यांचे अंतरंग शिष्य’ म्हणाले, ते गझलकार प्रदीप निफाडकर. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता- स्वप्नमेणा. ज्याची आता तिसरी आवृत्ती संपली आहे. त्यांनी ‘गझल’ या काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव ‘गझलदीप’ आहे. त्याचीही पहिली आवृत्ती संपली आहे. […]

प्रदीप कबरे

कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे. […]

पुरुषोत्तम भास्कर भावे

६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले. […]

पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु. ना. ओक

पु.ना.ओक यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि कायद्याची पदवी घेतली. काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर ब्रिटीश आर्मी जॉईन केली. दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर मध्ये त्यांची पोस्टिंग होती. […]

1 2 3 4 5 6 57