मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

पिराजी रामजी सरनाईक

पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले. […]

पांडुरंग सातू नाईक

जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे. […]

पंडीत अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर

ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रोड्यूसर म्हणून काम करताना गजेंदगडकर यांना गंगूबाई हनगल, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासारख्या अनेक श्रेष्ठ गायकांचा सहवास लाभला. […]

पं.सत्यशील देशपांडे

तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य. कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. […]

नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले

अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली. […]

नीलकंठ खाडिलकर

खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या. […]

निरंजन घाटे

प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’ सारखी पुस्तकंही लिहिली आहेत. […]

निरंजन उजगरे

निरंजन उजगरे यांनी एक मुख्य काम केले ते म्हणजे कवी-संपादन-अनुवादाच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण केले , आणि त्यांच्या महत्वाकांक्षी ‘ काव्यपर्व ‘ या पुस्तकांची निर्मिती झाली. . स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता -२१ भाषा आणि १७० कवींच्या कविता त्यात आहेत. […]

ना. धों. ताम्हनकर

आधुनिक मुलांच्या गोष्टींव्यतिरिक्त ताम्हनकरांनी अंकुश, अविक्षित, नारो महादेव, नीलांगी अशा ऐतिहासिक धाटणीच्या कथाही लिहिल्या होत्या. […]

नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ

पिंपरीमध्ये हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक आणण्यामध्येही काकासाहेब गाडगीळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. केंद्रीय बांधकाम मंत्री या नात्याने काकासाहेब गाडगीळ यांनी उत्तर भारतातील सीमेवरच्या रस्त्यांचे जे बांधकाम केले ते ६२-६५च्या युद्धात फायदेशीर ठरल्याचे तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनीही मान्य केले होते. भाकरा नांगल व कोयना धरण उभारण्यातही काकांचे योगदान मोठे आहे. […]

1 3 4 5 6 7 57