पिराजी रामजी सरनाईक

शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचा जन्म २८ जुलैला झाला.

शाहीर तिलक, शाहीर विशारद आणि करवीर दरबारचे शाहीर व ‘लहरी हैदर गुरूजी माझे शीघ्र कवी थोर! त्यांच्या कृपेने शाहीर पिराजी पोवाडा लिहिणार!’ असे म्हणणा-या पिराजी रामजी सरनाईक या शाहिराने आपल्या खडय़ा आवाजात अनेक चित्रपटांतून, नाटकांतून, वीररसाने ओथंबलेले पोवाडे म्हटले आणि पिचलेल्या मनगटातही जान आणली, छातीत स्फुरण आणले.

‘सावकारी पाश या चिटपटातील पोवाडय़ाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. मुंबईच्या हिज मास्टर्स व्हाईस कंपनीने १९३७ मध्ये मुंबईची कहाणी हे त्यांचे पहिले ग्रामोफोन रेकॉर्डिग केले.

महाराष्ट्र शाहिरी संमेलनाने त्यांना ‘शाहीर तिलक’ म्हणून गौरवले. ‘म्यानातून तलवार उपसावी’ असा शाहिरांचा आवाज बाहेर पडतो’ अशा शब्दांत शिवभक्त भालजींनी ज्यांना गौरव केला, असे हे शाहीर पिराजीराव! ज्यांच्या शंभरावर पोवाडय़ांच्या रेकॉर्डस प्रसारित झाल्या, असा हा करवीर शाहीर.

शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचे ३० डिसेंबर १९९२ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*