मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

केशवराव भोळे

मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे. […]

केशव विष्णू बेलसरे

त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला. […]

कृष्णदेव मुळगुंद

मुळगंद यांच्या कलासाधनेची दखल समाजानेही घेतलेली आहे. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कै. राजा मंत्री पुरस्कार, कै. मधू आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. […]

कृष्णाजी नारायण आठल्ये

त्यांचे वडील दशग्रंथी असल्यामुळे संहिता, शिक्षा, ज्योतिष, छंद इ. विषयांचे ज्ञान त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच प्राप्त झाले. याशिवाय कराड येथे त्यांचे थोडेसे इंग्रजी शिक्षण झाले. त्यानंतर पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजात राहून त्यांनी तेथील अभ्यासक्रम पूर्ण केलाद व शिक्षकाचा पेशा पतकरला. […]

केदार शिंदे

नाटकांमध्ये ‘आमच्या सारखे आम्हीच’, ‘मनोमनी’, श्रीमंत दामोदरपंत’, ‘तू तू मी मी’, विजय दिनानाथ चव्हाण’, ‘आता होऊनच जाऊ दे’, ‘सही रे सही’, ‘लोच्या झाला रे’, ‘गोपाला रे गोपाला’ ह्यांचा समावेश होतो. त्याने मुख्यतः खळखळून हसवणारी विनोदी नाटकेच केली आहेत. […]

कुसुम अभ्यंकर

कुसुम अभ्यंकरांची दुसरी ओळख म्हणजे त्या रत्नागिरीच्या मतदारसंघातून १९७८ साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्या काळात खेडोपाडी फिरून त्यांनी आपल्या मतदारांच्या अडीअडचणींकडे जातीने लक्ष पुरवले. उत्तम वक्तृत्वाची कला त्यांच्याजवळ होती. त्यामुळे माणसांशी संवाद साधून माणसे जोडण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते. […]

कमलाकर सोनटक्के

थोड्याच दिवसात सोनटक्केनी अल्काझींचे मन जिंकले. व ते त्यांचा जणू उजवा हातच बनले. अल्काझींच्या प्रत्येक कामात त्यांना सोनटक्केंचा सहवास भासु लागला. पहिल्याच वर्षी त्यांच्या ‘अंधायुग’ या निर्मितीचे स्क्रिप्ट इनचार्ज म्हणून त्यांनी काम पाहीले. अल्काझींच्या कामाची ताकद त्यांना जाणवत होती. एकदा तर पंतप्रधानांची कांही मिनिटासाठी असलेली भेट, त्यांनी संपूर्ण शो पाहून गेल्याची त्यांची आठवण होती. […]

कमलाकर नाडकर्णी

नाडकर्णी यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक (आगामी) ही पुस्तके लिहिली आहेत. […]

आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद

दूरदर्शनवर त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर बालसाहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांनी मुलांसाठी सुमारे ३०० पुस्तके लिहिली. […]

अशोक शेवडे

अशोक शेवडे यांचा साहित्य, शिक्षण, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट जनसंपर्क होता या सर्वांपेक्षा सुद्धा प्रत्येकाशी मैत्रीचे संबंध जोडणारे, माणुसकीच्या नात्याने वागणारे संयमी, सुहास्यवदन, संवेदनाशील सौजन्याने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व होते. […]

1 5 6 7 8 9 57