निरंजन उजगरे

निरंजन उजगरे यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४९ रोजी भुसावळ येथे झाला. त्यांचे शिक्षण मुबंईत झाले. ते व्ही.जे.टी.आय मधून मेकॅनिकल इंजिनीअर झाले . त्यांनी वयाच्या ९ व्या वर्षी पहिली कविता लिहिली. त्यांना हा वारसा त्यांच्या आजोबांकडून मिळाला असावा कारण त्यांचे आजोबा भाषाभास्कर भास्करराव उजगरे , त्यांनी दाते शब्दकोशासाठी नवीन मराठी शब्दांची निर्मिती करून शब्द पुरवले. होते , म्ह्णून त्यांना ‘ भाषाभास्कर ‘ ही पदवी मिळाली होती .

निरंजन यांचे लेखन चालू होते त्यावेळी त्यांनी स्वतःची छोटी इंजिनिरिंग कंपनी सुरु केली. निरंजन उजगरे यांनी ‘ आधी नवे घर ‘ हा व्यक्तिचित्रांचा संग्रह लिहिला त्यानंतर ‘ त्यांचा ‘ दिनार ‘ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला , त्याचे भाषांतर उर्दूत झाले . उर्दू मध्ये भाषांतरीत झालेला हा पहिलाच मराठीतील काव्यसंग्रह होता.

निरंजन उजगरे ह्यांनी जे लेखन केले ते फार डोळसपणे केले ते लिहिण्यामागे एक वेगळी उर्मि होती . त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले ‘ हिरोशिमाच्या कविता ‘ त्यांनी अनुवादित केल्या.

सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगांवकर हे त्यांच्या आत्याचे पती होते. खरे तर पाडगावकरांमुळे ते खूप वाचू लागले कारण मंगेश पाडगांवकर त्यांना सुरवातीपासून पुस्तके देऊन वाचण्यास प्रवृत्त करत होते. अनेक वेळा पाडगावरांशी चर्चा चालू असताना वादही होत परंतु ते तेवढ्यापुरतेच असे.निरंजन उजगरे याचा स्वभाव बोलका होता आणि कुणालाही ते दुखवत नसत . अर्थात त्याचे फटके त्यांना बसत असत .

निरंजन उजगरे यांनी हिब्रू कवितांचे भाषान्तर देखील केले . त्याच्या हिब्रूतून भाषांतर केलेल्या काव्य संग्रहाचे नाव आहे ‘ विणू लागली आजी ‘ . त्यांनी मूळ सिंधी कवितांचा अनुवाद ‘ फाळणीच्या कविता ‘ या नावाने केला . मूळ तेलगू भाषेतील पाणी या विषयाला वाहिलेल्या दीर्घ कवितांचा अनुवाद ‘ पाण्याचं गाणं ‘ या पुस्तकात केला आहे. त्यांनी भारतातील विविध भाषेतील उत्तमोत्तम कवींच्या कविता मराठीत आणल्या हे महत्वाचे.

बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात निरंजन उजगरे यांनी वर्तमानपत्रातून आव्हान करून तरुण कवीकडून कविता मागवल्या होत्या ६५० कवीकडून सुमारे १४०० कविता आल्या होत्या त्यांची योग्य प्रकारे निवड करून ५० कवीच्या ५० कविता निवडल्या होत्या. हे काम अथकपणे निरंजन-अनुपमा उजगरे यांनी केले. पुढे त्या कवितांचे पुस्तक झाले.

त्याचा शेवटचा काव्यसंग्रह ‘ तत्कालीन ‘ हा होता, त्यात त्यांच्या जानेवारी ते डिसेंबर २००३ पर्यंतच्या कविता त्यात होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचा ‘ कांगारूचे आप्त ‘ ह्या नावाचे ऑस्ट्रेलिया येथील मराठी बांधवांच्या लेखनाचे पुस्तक ‘ ग्रंथाली ‘ ने काढले. त्यांचे ‘ काव्यपर्व ‘ तर साकार झाले परंतु त्यांचे ‘ जीवनपर्व ‘ मात्र अकाली संपुष्टात आले .

हळूहळू त्याची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचे १२ डिसेंबर २००४ रोजी ठाण्यात अकाली निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*