प्रदीप कबरे

कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत.

प्रदीप कबरे यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला. कलाक्षेत्राची प्रदीप कबरे यांना सुरुवातीपासून आवड होती. कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांनी अभिनयाला सुरवात केली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘वेटिंग फॉर घासलेट’ ही पहिली एकांकिका केली होती. ती ‘आयएनटी’मध्ये सादर झाली होती. व या एकांकिकेसाठी ‘आयएनटी’चं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिकही मिळालं होतं.

प्रदीप कबरे यांनी या नाटकात हवालदाराची विनोदी भूमिका केली होती. व तेव्हाच प्रदीप कबरे यांच्या मनात आलेकी स्वत:ची नाटय़संस्था स्थापन करावी.

स्वत:ची नाटय़संस्था स्थापण्याचा विचार सुचला तरी तो लगेच अमलात आला नाही. कारण दरम्यानच्या काळात प्रदीप कबरे यांची अभिनय कारकीर्द जोरात धावू लागली होती. कमलाकर सारंग यांच्या ‘खोल खोल पाणी’, ‘सखारम बाईंडर’ आणि ‘जोडीदार’ या नाटकांत त्यांना भूमिका मिळाल्या. ‘माऊली प्रॉडक्शन’ची ‘कार्टी प्रेमात पडली’,‘ देखणी बायको दुस-याची’ आणि ‘दांडेकरांचा सल्ला’ ही नाटकंही त्यांच्या वाट्याला आली.

कमलाकर माझ्यामागे उभा राहील, अशी मला आशा होती. त्याने हे नाटक दिग्दर्शित करायचं कबूल केलं. आणि १९८७ मध्ये प्रदीप कबरे यांनी ‘गुरू प्रॉडक्शन’ची स्थापना केली. हे नाटक प्रेक्षकांना आवडलं. सुधीर कवडीला या नाटकाबद्दल त्यावर्षीचं राज्य सरकारचं सर्वोत्कृष्ट नाटय़लेखनाचं पारितोषिक मिळालं.’’

‘गुरू’च्या वाटचालीत ‘हँडस अप’ आणि ‘चाफा बोले हा’ ही दोन नाटकं महत्त्वाचा टप्पा ठरली. ‘हँडस अप’ नाटकाचे आजवर २५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी या नाटकात भूमिका केल्या होत्या.

‘गुरू प्रॉडक्शन’ ने अनेक नवोदित कलाकारांना रंगभूमीवर ब्रेक दिलाय. ‘एप्रिल फूल’ या नाटकातल्या सगळ्या कलाकारांचं ते पहिलंच नाटक होतं.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या “मराठी नाट्य कलाकार संघा‘च्या अध्यक्षपदी प्रदीप कबरे यांनी काही काळ काम केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*