वर्धा जिल्हा

Wardha District

बापूजींचा ‘सेवाग्राम’, आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील ‘परमधाम’ आश्रम व आष्टीचा स्वातंत्र्य संग्राम या तीन गोष्टींमुळे वर्धा या जिल्हयाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्धा जिल्हा राष्ट्रीय जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. ग्रामोद्योगांना प्रेरणा याच जिल्ह्याने दिली. राष्ट्रभाषा चळवळ येथूनच सुरू झाली. विदर्भाच्या साधारण मध्यभागी असलेला जिल्हा ऐतिहासिक वारशासह व कापूस या नगदी पिकासह विकासासाठी प्रयत्नरत आहे.