गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक माहिती

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. सध्या गडचिरोलीचे १२ तालुके आहेत, पण विभाजनापूर्वी या भागात गडचिरोली व सिरोंचा हे दोनच मोठे तालुके अस्तित्वात होते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा भाग चंद्रपूरमध्येच समाविष्ट होता. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्वेस असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४४१४ चौ.कि.मी आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या ९,७०,२९४ आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७९.३६% भाग वनांनी व्यापला आहे. जिल्ह्यात कडक उन्हाळे व हिवाळे असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*