जॉर्जिया घुमट

अमेरिकेतील जॉर्जिया घुमट स्टेडियम हे या प्रकारातील जगातील सर्वांत मोठे स्टेडियम आहे. ८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमचा विस्तार ९.१९ एकरांत आहे. याचे छत टेफलॉन व फायबरपासून बनविलेले आहे.

ओपेरा हाऊस

सिडनीतील ओपेरा हाऊसची रचना डच आर्कोटेक्ट जॉन उत्झॉन यांनी केली. २० ऑक्टोबर १९७३ रोजी त्याचे उद्घाटन झाले. युनेस्कोने या ठिकाणाचा २००७ मध्ये जागतिक वारसा यादीत समावेश केला.

मोनार्च राखीव उद्यान

मेक्सिकोमधील मोनार्च राखीव उद्यानात फुलपाकरांच्या हजारो जाती आढळतात. येथे अनेक जातींची फुलपाखरे प्रजनन काळात जमतात. युनेस्को ने हे ठिकाण जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे.

माउंट वेई

दक्षिण चीनमधील माउंट वेईचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. येथे प्राचीन काळातील अनेक मंदिरे, शिलालेख पाहायला मिळतात. पहिल्या शतकातील हान राजवटीच्या खुणा येथे दिसतात.

टेट्रो ऑलिम्पिक थिएटर

उत्तर इटलीमद्ये असणारे टेट्रो थिएटरचे बांधकाम १५८० ते १५८५ या काळात झाले. आंद्र पलाडिया याने याची रचना केली. मात्र, याचे उद्घाटन पलाडियाच्या मृत्यूनंतर ३ मार्च १५८५ ला झाले.

टेंपल ऑफ हेवन

टेंपल ऑफ हेवन हे मंदिर बीजिंग शहरात आहे. इ.स. १४२० ला या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मोंग आणि क्विंग या राज्यकर्त्यांचे वारसदार या मंदिरात चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात.

वाळूचे बेट फ्रासर

ऑस्ट्रेलियातील फ्रासर बेट हे जगातील सर्वांत मोठे वाळूचे बेट आहे. या बेटाचा विस्तार १ लाख ८४ हजार हेक्टर उतका आहे. स्फटिकासारख्या सुंदर पाण्याचे तलाव या बेटावर आढळतात.

माउंट वुताई

माउंट वुताई हा चीनमधील बौध्द धर्मातील लोकांसाठी पवित्र डोंगर आहे. येथे असलेल्या ४० मठांमध्ये बुध्दांच्या ५०० मूर्ती व चित्रांचा समावेश आहे. पाच शिखरांचा डोंगर असेही याला म्हटले जाते.

थोर्स वेल

अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.

क्युनका

स्पेनमधील क्युनका हे गाव डोंगरातील दगडांवरील विशिष्ट प्रकारच्या घरांसाठी प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात हे गाव वसविण्यात आले. याची रचना आणि त्याचा ऐतिहासिक ठेवा स्पेनने जपला आहे.

1 25 26 27 28 29 32