सॅंटो डॉमनिगो

कोलंबसने १४९२ ला या बेटावर पाऊल ठेवल्यानंतर हे बेट प्रकाशात आले. येथील टाऊन प्लॅनिंग संपूर्ण जगासाठी आदर्श असे आहे. अमेरिकेतील पहिले चर्च, हॉस्पिटल, विद्यापीठ येथे आहे.

सर्वात लांब नाईल

आफ्रिकेतील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी ६८५३ कि.मी. लांब असून, तिच्या पाण्याचा उपयोग ११ देशांना होतो. इजिप्शियन संस्कृतीत नाईल ला महत्त्वाचे स्थान आहे.

सर्वात उंच इमारत

दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे सर्वाधिक उंच म्हणून ओळखले जाते. या टॉवरची उंची ८१८ मीटर म्हणजे २ हजार ७२२ फूट एवढी आहे. यापूर्वी तैपेई १०१ या ५०८ मीटर उंचीच्या इमारतीची नोंद होती.

देवोचेंग याडिंग विमानतळ

चीनमधील देवोचेंग विमानतळ हा जगातील सर्वांत उंचीवरील विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून १४,४७२ फूट उंचीवर असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ रोजी झाले.

जॉर्जिया घुमट

अमेरिकेतील जॉर्जिया घुमट स्टेडियम हे या प्रकारातील जगातील सर्वांत मोठे स्टेडियम आहे. ८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमचा विस्तार ९.१९ एकरांत आहे. याचे छत टेफलॉन व फायबरपासून बनविलेले आहे.

महाराष्ट्रात जलसिंचनावर भर

राज्यातील बहुतांश शेती अनियमित स्वरुपाच्या मोसमी पावसावर अवलंबून असल्याने शासनाचा जलसिंचनावर भर आहे. पहिल्या पंचवार्षीक योजनेत जलसिंचन विकासावर ८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला तर ८व्या पंचवार्षिक योजनेत मोठ्या मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्यावर ५,३२७ […]

ओपेरा हाऊस

सिडनीतील ओपेरा हाऊसची रचना डच आर्कोटेक्ट जॉन उत्झॉन यांनी केली. २० ऑक्टोबर १९७३ रोजी त्याचे उद्घाटन झाले. युनेस्कोने या ठिकाणाचा २००७ मध्ये जागतिक वारसा यादीत समावेश केला.

महाराष्ट्र राज्याची वार्षिक योजना

राज्याच्या वार्षिक योजनेचे सन २०१३-१४चे आकारमानच्या १०.२ टक्क्यांप्रमाणे ४ हजार ७८७ कोटी ६८ लाख रुपये अनुसूचित जाती उपयोजनेसाठी आणि ८.९ टक्के प्रमाणे ४ हजार१७७ कोटी ४८ लाख रुपये आदिवासी उपयोजनेसाठी ठेवण्यात आलेले आहेत.

मोनार्च राखीव उद्यान

मेक्सिकोमधील मोनार्च राखीव उद्यानात फुलपाकरांच्या हजारो जाती आढळतात. येथे अनेक जातींची फुलपाखरे प्रजनन काळात जमतात. युनेस्को ने हे ठिकाण जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे.

माउंट वेई

दक्षिण चीनमधील माउंट वेईचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. येथे प्राचीन काळातील अनेक मंदिरे, शिलालेख पाहायला मिळतात. पहिल्या शतकातील हान राजवटीच्या खुणा येथे दिसतात.

1 38 39 40 41 42 111