अर्जेंटिना

आर्जेन्टिना (स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना (द.अ.) किंवा आर्खेन्तिना (स्पे.)) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४०.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २७,६६,८८९ एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा देश आहे. या देशाचा धर्म ख्रिश्चन असून येथे स्पॅनिश व इटालियन भाषा बोलल्या जातात. फक्त दक्षिण अमेरिका खंडाचा विचार केल्यास हा देश आकाराने दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा देश बोलिव्हिया व केप हाॅर्नच्या मध्ये ३७०० किमी. लांब पसरलेला आहे. याची जास्तीत जास्त रूंदी १५०० किमी. आहे. अमेरिकेतील एका भव्य पर्वताचे ”’अकंकागुआ”’ नावाचे सर्वात उंच शिखर मात्र या देशात आहे. १८१६ मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाले. जगातील डिएगो मॅराडोना, लायोनेल मेस्सी हे नाववंत फुटबॉलपटू याच देशातील आहे. आर्जेन्टिनात कोळसा, शिसे, तांबे, जस्त, सोने, चांदी, निकेल व गंधकाचे साठे आहेत. हवाबंद डब्यात मांस भरून निर्यात करने, हा आर्जेन्टिनाचा प्रमुख उद्योग आहे.

आर्जेन्टिना हे नाव लॅटीन भाषेतील argentum (चांदी) ह्या शब्दापासून तय्यार झाले आहे. आर्जेन्टिना ह्या शब्दाचा पहिला लिखित स्वरुपात असलेला उल्लेख La Argentina (१६०२) नामक Martín del Barco Centenera च्या कवितेत सापडतो. आर्जेन्टिना हे नाव १८व्या शतकापर्यंत चलनात आले. इ.स. १८२६ च्या संविधाना मध्ये प्रथम Argentine Republic ह्या नावाचा उल्लेच सरकारी दस्तऐवजामध्ये दिसतो.

Amerigo Vespucci अमेरिगो वेस्पुची च्या इ.स. १५०२ मधील जालप्रवासासोबत युरोपीय लोक पहिल्यांदी अमेरिकी खंडाच्या ह्या भागात आले. Juan Díaz de Solís आणि Sebastian Cabot सारखे दर्यावर्दी या भागात इ.स. १५१६ आणि इ.स. १५२६ साली अनुक्रमे आले. १५३६ मध्ये पेद्रो दे मेंडोसा (Pedro de Mendoza) ने बुएनोस आइरेस नामक एक छोटी वसाहत स्थापित केली. पण ही वसाहत इ.स. १५४१ मध्ये नष्ट केली गेली.

आर्जेन्टिनाच्या उत्तरेस पेराग्वे व बोलिव्हिया, ईशान्येस ब्राझिल व उरुग्वे, पश्चिमेस चिली हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहे. आर्जेन्टिनाचे क्षेत्रफळ २७,८०,४०० चौरस किलोमीटर एवढे आहे. पाराना आणि उरुगुआइ ह्या आर्जेन्टिना मधील दोन महत्वाच्या नद्या आहेत.

बुएनोस आइरेस : बुएनोस आइरेस, आर्जेन्टिनाची राजधानी आणि देशातील सर्वात मोठे शहर आहे. त्यासोबतच बुएनोस आइरेस हे दक्षिण अमेरिकेतील दुसरे सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. बृहन बुएनोस आइरेस हे शहर बुएनोस आइरेस प्रांताचे भाग किंवा राजधानी नाही आहे. हे शहर आर्जेन्टिनातील एकमेव स्वायत्त शहर आहे. १८८० बुएनोस आइरेस शहराला बुएनोस आइरेस प्रांतातून विभागले गेले.

मेक्सिको शहर आणि साओ पाओलो सोबत बुएनोस आइरेस, हे लॅटीन अमेरिकेतील ३ मोठ्या शहरांपैकी एक आहे. बुएनोस आइरेसच्या रहिवाश्यांना अनेकदा पोर्तेन्योस (Porteños) हि म्हणतात. Porto म्हणजे बंदर आणि बुएनोस आइरेस हे बंदराचे शहर आहे.

कोर्दोबा : कोर्दोबा हे शहर आर्जेन्टिनाचे दुसरे सर्वात मोठे शहर आणि कोर्दोबा प्रांताची राजधानी आहे. कोर्दोबा आर्जेन्टिनाच्या भौगोलिक मध्यात स्थित आहे. बुएनोस आइरेस पासून ७००किमी वायव्य दिशेला कोर्दोबा शहर स्थित आहे. २००१ च्या जनगणने नुसार कोर्दोबाची लोकसंख्या १३ लाख एवढी आहे. कोर्दोबाची स्थापना ६ जुलै १५७३ साली खेरोनिमो लुइस दे कॅब्रेराने केली.

राजधानी व सर्वात मोठे शहर : बुएनोस आइरेस
अधिकृत भाषा : स्पॅनिश
स्वातंत्र्य दिवस : (स्पेनपासून) जुलै ९, १८१६ (घोषित) १९२१ (मान्यता)
राष्ट्रीय चलन : पेसो (ARS)

देश : अर्जेंटिना
राजधानी : ब्युनोस एअर्स
चलन : अर्जेंटाईन पेसो


Country : Argentina
Capital city : Buenos Aires
Currency : Argentine peso
Calling code : 54
Country Domain : .ar

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*