सातारा जिल्ह्याचा इतिहास

History of Satara District

Pratapgad Fort
प्रतापगड किल्ला
सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे.
सातारा जिल्हा व परिसरात पूर्वी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादवी, बहामनी व आदिलशाही या राजवटींनी राज्य केले.
कोल्हापूर व सातारा परिसराचा इतिहास प्रामुख्याने मराठेशाहीशी जोडलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम यांनी १६९८ मध्ये साताऱ्याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. ही गादी थोरली पाती म्हणून ओळखली जाते. १७०८ मध्ये संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सातारा गादीवर झाला होता. पुढे काही काळ मराठेशाहीत दुर्दैवी संघर्ष चालू होता, परंतु वारणा नदीकाठी संभाजी महाराजांचे पुत्र शाहू व राजारामांचे पुत्र दुसरा संभाजी यांचेमध्ये (१७३१) तह झाला, आणि कोल्हापूर व सातारा या सिंहासनांमधील दुही संपली.
छत्रपती शाहू महाराज अनेक वर्षे सातार्‍याच्या गादीवर विराजमान होते. शिवकालीन इतिहासातही सातार्‍याचे स्थान महत्त्वाचे होते. समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट जेथे झाली ते ठिकाण चाफळ(तालुका पाटण) याच जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवरायांनी अफझलखानाचा शिताफीने वध केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतच सातारा शहराचे महत्व वाढले होते. पाटण तालुक्यातील चाफळ येथे समर्थ रामदास स्वामींची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती. आणि त्यानंतर राजे समर्थांचे शिष्य बनले.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात नाना पाटील या थोर क्रांतिकारकाने याच जिल्ह्यातून ब्रिटीशांशी लढा दिला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*