मुंबई जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे संपूर्ण नागरीकरण झालेले असल्याकारणाने येथे शेतीयोग्य जमीन नाही. भारतातील ऊस ही मुंबईची देणगी असे म्हणता येईल. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ऊसाची लागवड चालू झालेली नव्हती. साखर खास करून मॉरिशसहून आयात केली जाई. पण मुंबईतील २ व्यक्तींनी मॉरिशसच्या ऊसाची लागवड मुंबईत सुरू केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. फ्रांमजी कासवजी बनाजी यांनी पवईला आंब्यासोबत मॉरिशसच्या ऊसाच्या लागवडीचा प्रयोग केला. दुसरे कल्पक गृहस्थ नाना शंकर शेट यांनीही मॉरिशसहून ऊसाचे बियाणे मागवून ताडदेवला नमुनेदार ऊस पिकवून दाखवला होता. आज भारतात जो ऊस पिकवला जातो तो प्रामुख्याने मॉरिशस जातीचाच आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*