दिक्षीत, शंकर बाळकृष्ण

ठाण्यामधील व्यासंगी विद्वानांपैकी घेतले जाणारे नाव म्हणजे शंकर बाळकृष्ण दिक्षीत हे ज्योतिषशास्त्राच्या विविध पैलुंवरील त्यांचा आभ्यास परिपूर्ण पध्दतीचा होता. भारतीय प्राचीन ज्योतिषशास्त्राला मिळालेली अचूकतेची व परिपक्वतेची किर्ती, ही ग्रीसमधील किंवा इतर परकीय ज्योतिषशास्त्रांच्या मुलतत्वांचे अनुकरण केल्याने मिळालेली नसून, हे ज्ञान भारतात रुळलेले आहे व ते स्वकियांच्या इतक्या वर्षांच्या वैज्ञानिक विचारमंथनामुळे व चतुरस्त्र आभ्यासपध्दतींमुळे, पावन व दगडावरच्या रेषेसारखे अनाशवंत झाले आहे, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले होते. भारतातील निरनिराळ्या ज्योतिषशास्त्रीय संकल्पना व निकष हे इथल्या संस्कृतीचे पाईक आहेत, व टॉलेमी पासून इथले ज्योतिर्विज्ञान अस्तित्वात आलेले नाही हे पुराव्यांसहित पटवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

शंकर दिक्षितांनी विद्यार्थीबुध्दिवर्धिनी, सृष्टी चमत्कार, सोपपत्तिक अंकगणित, धर्ममीमांसा व ज्योर्तिविलास, ही विज्ञानावर अधिष्ठीत पुस्तके लिहीली. भारतीय ज्योतिषशास्त्र हा ज्योतिषशास्त्राच्या इतिहास व विकासावर लिहिलेला ग्रंथ तत्कालीन विद्वानांमध्ये मान्यता पावला होता. दिक्षीत यांचे मराठी ज्योतिषशास्त्राच्या परंपरेला अधिक भरीव व प्रगतशील बनविणारे योगदान म्हणजे त्यांनी, जानार्दन मोडक व भास्कर पाळंदे या तिघा विद्वानांनी मिळून मराठीतील पंचांगांवर पहिले सायंपंचांग प्रसिध्द केले. त्यांच्या ज्योतिषशास्त्राच्या सखोल आभ्यासामुळे पाश्चात्य इतिहासकार फ्लांट व डॉ.रॉबर्ट सेबेल यांना प्राचीन भारताची कालगणना करणे सोपे गेले. डॉ. फ्लांट यांचा प्रसिध्द शोधग्रंथ गुप्त इन्स्क्रिप्शन्स यात दिक्षितांबद्दल आदर व्यक्त गेला आहे. डॉ. सेबेल यांनीही इंडियन कॅलेंडर या त्यांच्या पुस्तकात दिक्षितांच्या कार्याचा सार्थ गौरव केलेला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*