पत्रकारितेत आपली मोहर उमटवणार्‍या मराठी पत्रकारांची माहिती.

केतकर, कुमार

४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव अणि खर्‍या अर्थाने जगरहाटी करुन निष्ठेने पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे पक्के ठाणेकर. आठ वर्षं “महाराष्ट्र टाईम्स”, त्यानंतरची सात वर्षे “लोकसत्ता”, नंतर `लोकमत’ आणि शेवटी `दिव्य मराठी’ या मराठी दैनिकांचे मुख्य संपादकपद त्यांनी भूषविले आहे. […]

बल्लाळ, मिलिंद

ठाण्यातील पत्रकार परंपरेतील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे तीस वर्षं पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे मिलिंद बल्लाळ. १८ वर्षं टाईम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणारे मिलिंद बल्लाळ सध्या “ठाणे वैभव” या वृत्तपत्राचे संपादक आहेत.
[…]

(डॉ.) उदय सखाराम निरगुडकर

ठाण्यातील एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारं पहिलं कॉल सेंटर सुरु करुन डॉ. निरगुडकरांनी एक नवा वस्तुपाठच घालून दिला आहे. तसेच संपूर्ण भारतातील ६०,००० अर्धशिक्षित तरुणांना स्वयंरोजगारासाठी क्षमतावृद्धीचे शिक्षण देऊन रोजगारासाठी समृद्ध केलं.
[…]

करदेकर, शीतल

महाराष्ट्रातील आघाडीच्या “स्त्री पत्रकार” आणि “स्त्री विषयक लेखन” करणार्‍या शीतल करदेकर यांनी वार्ताहार, वृत्तमानस अशा वृत्तपत्रांमधून राजकीय चित्रपट तसंच नाटकांशी संबंधित सातत्याने लेख तसंच बातमीदारी केली आहे. […]

देसाई, हेमंत

हेमंत देसाई हे गेली जवळपास ३६ वर्षं पत्रकारितेत आहेत. मराठी दैनिकात आर्थिक पत्रकारितेचा अध्याय सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात ज्येष्ठ सहायक संपादक म्हणून, तसंच महाराष्ट्र टाइम्स मध्ये एकूण २६ वर्षं काम केले.
[…]

रणदिवे, दिनू

ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना “सिंहासन” कादंबरीसाठी सुचलेली दिघू टिपणीसांची व्यक्तीरेखा ही रणदिवेंवरुनच सुचल्याचं अनेकजण अगदी ठामपणे सांगतात. दिनू रणदिवे यांच्या व्यक्तीमत्त्वानं प्रेरित होऊन अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याविषयी आदरानं बोलतात व त्यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवताना दिसतात. […]

तेली, अमोल

नकलाकार म्हणून अमोलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक नामवंत कलाकार तसेच खेळाडू व पक्षी, अनेकविध आवाजात त्यानी प्राविण्य मिळवले आहे.
[…]

बोरकर, बाळकृष्ण भगवंत (बा. भ. बोरकर)

बा. भ. बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जन्म इ.स. १९१० मध्ये गोव्यातील कुडचडे गावी झाला. बा. भ. बोरकर यांनी एक प्रसिध्द प्रतिभावंत कवी म्हणून ख्याती मिळवली.
[…]

1 3 4 5 6 7 8