पत्रकारितेत आपली मोहर उमटवणार्‍या मराठी पत्रकारांची माहिती.

परब, मंदार

मंदार परब हे सध्या ‘झी चोवीस तास’ या प्रादेशिक बातम्या देणार्‍या, व मराठी भाषिकांचे जग व त्यांच्या जीवनांत घडलेल्या विवीध घडामोडी उलगडुन दाखविणार्‍या लोकप्रिय वाहिनीचे संपादक आहेत. त्यांनी संपादकस्थान स्वीकारल्यापासुन या वाहिनीचा अंतरबाह्य कायापालट झाला आहे. या वाहिनीच्या अंतररुपात व बाह्यररूपांत जे अमुलाग्र बदल घडले आहेत, त्यालादेखील मंदार यांची आभ्यासु व नव्या तंत्रज्ञानांना कवटाळण्याची वृत्ती जबाबदार आहे.
[…]

दामले, योगेश

योगेश दामले हे महाराष्ट्रामधील परिचीत व सुप्रसिध्द पत्रकार असून त्यांनी पत्रकारितेशी व महाराष्ट्राच्या दुर्गम भागांमध्ये अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये गुजराण करणार्‍या आपल्या बांधवांशी दाखविलेली निष्ठा खरोखरीच स्पृहणीय आहे. असं म्हणतात की पत्रकारामध्येही एक समाजसेवक दडलेला असावा, व योगेश हे या अशा काही दुर्मिळ पत्रकारांच्या माळेमधील मणी आहेत, की ज्यांच्यातील झुंजार व तेजस्वी समाजसुधारक आपले दर्शन वारंवार इतरांना घडवित असतो. पत्रकारिता हा त्यांचा श्वास आहे व इतरांना जागृत करण्यासाठी चालविलेले व्रत आहे.
[…]

शेटे, तुषार

तुषार शेटे हे टी. व्ही. नाईन या वेगाने फोफावणार्‍या व आदर्श समाजबांधणीचे स्वप्न घेवून जगणार्‍या वृत्तवाहिनीच्या मुंबई विभागामधले धडाडीचे तरूण पत्रकार आहेत. सिनीयर करस्पॉन्डन्ट या हुद्यावर कार्यरत असलेल्या शेटेंनी या वृत्तवाहिनीच्या अनेक मोहिमा, कारवाया, व भेटींमध्ये हिरिरीने सहभाग घेतला असुन या क्षेत्रातील अनुभव अतिशय दांडगा आहे. प्रवासाची त्यांना लहानपणापासूनच भयंकर आवड होती व ती आवड आता आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पुर्ण करावयास मिळते आहे या गोष्टीचे त्यांना अतीव समाधान आहे.
[…]

घोरपडे, अभिजित

अभिजीत घोरपडे हा निसर्गाविषयी अभिरूची असलेला एक तरूण पत्रकार, निसर्गतज्ञ, व हवामानाचे अचूक मोजमापन व त्यांसंबंधीचे शास्त्रीय विश्लेषण लोकसत्ता वृत्तपत्राद्वारे वाचकांपर्यंत सोप्या शैलीत पोहोचविणारा लेखक आहे. जीवनात आतापर्यंत कितीतरी बहुआयामी कामे त्याने केलेली आहेत. काही त्याच्यामधील आभ्यासु विद्यार्थ्याला वाव देणारी, काही त्याच्यामधील प्रतिभावंत कलाकाराला न्याय देणारी तर काही त्यांच्या मधील चळवळ्या समाजसेवकाला अधिक परिपुर्ण बनविणारी. अभिजीत घोरपडे हा अतिशय दक्ष व सतत डोळ्यात तेल घालून सामाजिक अस्मितेचे रक्षण करणारा धडाडीचा पत्रकार असण्याबरोबरच तो त्याला शाहारून टाकणार्‍या सूंदर पक्ष्यांचा, प्राण्यांचा व नद्यांचा सच्चा मित्रदेखील आहे. […]

मुळ्ये, अभिजीत

आरोग्यविषयक विपुल व वैविध्यपुर्ण लेखन करून अनेक कौटुंबिक जोडप्यांच्या जीवनांमध्ये लक्षवेधी सुधारणा करणार्‍या निवडक काही तरूण पत्रकारांमध्ये अभिजीत मुळ्ये यांचे नाव घेता येईल. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी विवीध पदांवर व विभीन्न जबाबदार्‍यांवर आवडीने काम केले, असले तरी आरोग्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेभोवती फिरणार्‍या घटकांवर माहितीपर लेखन करणे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा प्रांत आहे. लहान असताना प्रत्येक गोष्टींवर चौफेर विचार करणार्‍या अभिजीत यांनी आपल्यातल्या जिज्ञासु पत्रकाराला अवांतर वाचनाद्वारे व सुक्ष्म निरीक्षण शक्तीद्वारे आकार दिलेला होता.
[…]

रायकर, दिनकर

ज्येष्ठ मराठी पत्रकार. सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक आहेत.
[…]

कांबळे, उत्तम

उत्तम कांबळे हे कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती. त्यांची आई शेतमजूर होती. घरात हालाखिचे दिवस होते. हातावर पोट चालणार घर
[…]

बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले. त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता. इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.
[…]

1 5 6 7 8