पत्रकारितेत आपली मोहर उमटवणार्‍या मराठी पत्रकारांची माहिती.

नाशिककर, पियुश

पियुष नाशिककर हा मराठीवर जीवापाड प्रेम करणारा व पत्रकारितेद्वारे मराठीचा प्रचार व प्रसार करण्याची सतत मनिषा बाळगणारा एक तरूण पत्रकार आहे. आधुनिक व इंग्रजी वातावरणात राहिलेला वाढलेला असला तरी मराठीशी त्याची असलेली नाळ अजुन तुटलेली नाही. लोकमत या नामांकित वृत्तपत्राच्या मुंबई आवृत्तीचा उपसंपादक म्हणून व दक्ष पत्रकार म्हणून त्याची ओळख सर्वपरिचीत आहे.
[…]

फणसे, मंदार

मंदार फणसे हे राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या नैसर्गिक शैलीमुळे व बहारदार व्यक्तिमत्वामुळे प्रसिध्द पावलेले एक अनुभवी व तरूण पत्रकार आहेत. हिंदी व मराठी वृत्त देणारे डेस्कवरचे पत्रकार व प्रादेशिक जबाबदार्‍यांची सुत्रे सांभाळण्याची सुत्रे त्यांच्या अखत्या पत्रकारिता या क्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा असून शिक्षण क्षेत्रातले त्यांचे विशेष कौशल्य, व संशोधक तसेच चौकस वृत्ती सर्वज्ञात आहे.
[…]

वागळे, निखिल

निखील वागळे हे आय. बी. एन. लोकमत या मराठीमधल्या सर्वात जास्त चालणार्‍या वृत्तवाहिनीचे तेजस्वी व बाणेदार पत्रकार असून राजकारणी लोकांच्या ते फारसे पचनी पडलेले नसले तरी सामान्य जनतेच्या मनात मानाचे स्थान त्यांनी केव्हाच पटकावलेले आहे. आपल्या स्प्ष्टवक्तेपणामुळे ते वादांच्या भोवर्‍यांमध्ये अनेकदा अडकले असले, तरी त्यांची परखड मते सुज्ञ लोकांना स्पर्शुन जाणारी असल्यामुळे, महाराष्ट्रातील लोकप्रिय व सर्वपरिचीत पत्रकारांमध्ये त्यांची गणती केली जाते.
[…]

करंदीकर, पराग

पराग करंदीकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व प्रथितयश पत्रकार असून महाराष्ट्र टाईम्स, सकाळसारख्या नामांकित व पुणे-मुंबईसारख्या महानगरांमधील नागरिकांचे मतप्रवाह ठरविणार्‍या वृत्तपत्रांसाठी वृत्तसंकलनाचे काम करून त्यांनी या क्षेत्रातील विपुल अनुभव गाठीशी जमविलेला आहे. […]

परब, मंदार

मंदार परब हे सध्या ‘झी चोवीस तास’ या प्रादेशिक बातम्या देणार्‍या, व मराठी भाषिकांचे जग व त्यांच्या जीवनांत घडलेल्या विवीध घडामोडी उलगडुन दाखविणार्‍या लोकप्रिय वाहिनीचे संपादक आहेत. त्यांनी संपादकस्थान स्वीकारल्यापासुन या वाहिनीचा अंतरबाह्य कायापालट झाला आहे. या वाहिनीच्या अंतररुपात व बाह्यररूपांत जे अमुलाग्र बदल घडले आहेत, त्यालादेखील मंदार यांची आभ्यासु व नव्या तंत्रज्ञानांना कवटाळण्याची वृत्ती जबाबदार आहे.
[…]

रायकर, दिनकर

ज्येष्ठ मराठी पत्रकार. सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक आहेत.
[…]

कांबळे, उत्तम

उत्तम कांबळे हे कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती. त्यांची आई शेतमजूर होती. घरात हालाखिचे दिवस होते. हातावर पोट चालणार घर
[…]

मोतीराम गजानन रांगणेकर

वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी एक कवडी नसतानाही स्वत:चे साप्ताहिक काढले. ‘तुतारी’, ‘वसुंधरा’, ‘चित्रा’, ‘आशा’ ही त्यांची गाजलेली साप्ताहिके, त्याचप्रमाणे ‘अरुण’, ‘सत्यकथा’, ‘नाट्यभूमी’ ही त्यांची गाजलेली मासिके होत. […]

1 5 6 7 8