पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात.

भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून मिळते.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुराजवळून वाहताना भीमा नदी चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तीचा उल्लेख चंद्रभागा असा केला जातो. वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी सोलापूर जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमा नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे.

याविषयी अख्यायिका सांगितली जाते की, शापित चंद्राने इथे येवून या तीर्थात स्नान केले व तो शापमुक्त झाला म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली व लोक तिला चंद्रभागा म्हणू लागले. काही संशोधकाचे मते भागवताच्या स्कंद ५ अध्याय १९ मधील १८ व्या श्लोकात हिंदुस्थानातील महान नद्यांचे वर्णन करताना भागीरथी व चंद्रभागा या नद्यांचे अस्तित्व दाखविलेले आहे. तसेच महाभारताच्या भीष्मपर्वात अध्याय ९ मध्ये देखील चंद्रभागा नदीचा उल्लेख केलेला आढऴतो.

5 Comments on पंढरपूरची चंद्रभागा नदी

Leave a Reply to Sanjeev Cancel reply

Your email address will not be published.


*