साहित्य :- दीड कप रवाळ कणीक, तेवढंच गरम पाणी लागेल. जरा जास्त तेलाची कांदा हिरवी मिरची, कढीलिंब घालून फोडणी, मीठ, तिखट इ.
कृती :- नेहमीसारखी कांदा इ. घालून फोडणी करावी. कणकेत मीठ, तिखट, हळद घालून चाळून घ्यावी. वरील फोडणीत घालून वास सुटेपर्यंत भाजावं. गॅस बंद करून कढई उतरवून पाणी घालावं. ढवळावं. पुन्हा वाफ येऊ द्यावी. उपरपेंडी फार गरम असताना चिकट वाटते. मग मोकळी होते. हरयाणवी
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply