पोळीचा मेतकूट रोल

मेतकूट+ मीठ+ तुप किंवा शेंगदाणा तेल एकत्र करुन लाटलेल्या पोळीवर पसरवणे व लच्छा पराठ्या सारखे लाटणे तुप लावून रोल करुन मुलांना देणे.

पॉपकॉर्न, बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न आणि मराठमोळं कणीस

मक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ […]

शिंगाड्याच्या पिठाचा शिरा

साहित्य : १ वाटी शिंगाड्याचे पीठ, पाऊण वाटी पिठीसाखर,४ वेलदोड्यांची पूड, पाव वाटी तूप, १ वाटी गरम पाणी कृती : तुमावर शिंगाड्याचे पीठ भाजून घ्यावे. नंतर खाली उतरवून त्यात गरम पाणी घालावे. नीट ढवळून पुन्हा गॅसवर […]

कणकेचा शिरा

साहित्य : १ वाटी कणीक, अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ, १ वाटी उकळीचे पाणी, १ अष्टमांश चमचा मीठ, १ डाव तूप, २ वेलदोड्यांची पूड. कृती : तुमावर कणीक भाजून घ्यावी. मंदाग्नीवर भाजावे. छान वास आला की त्यावर उकळीचे […]

सोया चंक्सची भाकरी

एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत,मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून […]

लसणाच्या पातीची भाकरी

मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा […]

गुळाची भाकरी

अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या […]

केळ्याची भाकरी

जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरीप्रमाणेच भाकरी करता येते.

ओतलेली भाकरी

हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुनही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची(सिमला मिरची) […]

उसाच्या रसातली भाकरी (दशमी)

उसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या […]

1 19 20 21 22 23 24