भार्गवराम विठ्ठल उर्फ मामा वरेरकर

वरेरकर, भार्गवराम विठ्ठल
भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म २७ एप्रिल १८८३ रोजी झाला.
भार्गवराम विठ्ठल वरेरकर हे मराठी नाटककार, कादंबरीकार, लेखक होते. त्यांचे शालेय शिक्षण मालवण व रत्नागिरी येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले. इ.स. १९०८ साली त्यांनी ‘कुंजविहारी’ हे पहिले नाटक लिहिले. पांतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, १९१८ रोजी प्रथम आलेले ‘हाच मुलाचा बाप’ हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले.
नाटककार, साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती.
त्यांचं साहित्य: े
नाट्यलेखन नाटक लेखन वर्ष (इ.स.) भाषा सहभाग कुंजविहारी १९०८ मराठी लेखन हाच मुलाचा बाप १९१७ मराठी लेखन संन्याशाचा संसार १९२० मराठी लेखन तुरुंगाच्या दारात १९२३ मराठी लेखन करीन ती पूर्व १९२७ मराठी लेखन सत्तेचे गुलाम १९३२ मराठी लेखन सोन्याचा कळस १९३२ मराठी लेखन सारस्वत १९४१ मराठी लेखन जिवाशिवाची भेट १९५० मराठी लेखन भूमिकन्या सीता १९५० मराठी लेखन अ-पूर्व बंगाल १९५३ मराठी लेखन [संपादन]
गौरव: 
पद्मभूषण पुरस्कार (१९५९) संगीत नाटक अकादमी फेलोशिप अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (धुळे, २९ वे संमेलन)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*