संत नामदेव

सामाजिक समतेचा व ऐक्याचा विचार प्रत्यक्षात आणणारे, त्या काळचे तीव्र जातिभेद न मानता भक्तिमार्ग सर्वाना खुला असतो हे जाणणारे व स्वत: या मार्गाचा प्रसार करण्या साठी दक्षिणेत रामेश्वरपर्यत तर उत्तरेकडे हिमाचल प्रदेशापर्यत पदयात्रा करणारे संतशिरोमणी नामदेव यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला.  (तिथीने कार्तिक शुध्द एकादशी, शके ११९२)

पंजाब व उत्तर प्रदेशात नामदेवाची मंदिरे आहेत.शिखांच्या गुरु ग्रंथसाहेब मध्ये नामदेवाच्या ६१ पदांना स्थान मिळाले आहे.

वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवीपैकी ते एक. पित्याचे नाव दामाशेट, आईचे गोणाई. नसरी बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते. तथापी हे गाव नेमके कोठले हयाबद्दल अभ्यासकांत ऐकमत नाही. कराडजवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे, असे एक मत आहे. नरसी-ब्राम्हणी‘ असा उल्लेख करुन महाराष्ट्र-सारस्वतकार वि. ल. भावे हयांनी ते सोलापूरकडचे गाव असल्याचे म्हटले आहे, तथापि असे गाव सोलापूर जिल्हयात नाही. मराठवाडयात नरसी आणि बामणी अशी दोन गावे आहेत. त्यांतील अंतरही फारसे नाही. नरसी हया गावाजवळच नामदेवांची समाधी व देऊळ आहे. हया गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते. त्यांचे आजोळ कल्याणी किंवा काणणी हेही हयाच परिसरातले. नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली, तरी त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवांची नरसी बामणी ही हया दोन गावांत सामावलेली असावी, असे सामान्यतः मानले जाते. नामदेव कृत म्हणून समजले जाणारे एक ‘आत्मचरित्र‘ नामदेवांच्या संकलित गाथ्यात अंंतर्भूत आहे. त्यात ‘गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण संसारी असोन नरसी गावी असा निर्देश सापडतो.

नामदेवांचा जन्म नरसी बामणीचा, की पंढरपूरचा हयासंबंधीही वाद आहे. वि.ल.भावे व महाराष्ट्र कविचरित्रकार ज. र. आजगावकर हयांच्या मते नामदेव नरसी-बामणी येथेच जन्मले, तथापि नामदवे पंढरपूरी जन्मल्याचा निर्वाळा बहूतेक प्राचीन संतचरित्रकारांनी दिलेला आहे. एकनाथांनी लिहिलेल्या नामदेव-चरित्रावरुन नामदेवांच्या आईने पुत्रप्रांप्तीसाठी पंढरीच्या विठोबास नवस केला होता आणि त्यापूर्वीच नामदेवांचे आईवडील पंढरपुरात येऊन राहू लागल्याचे दिसते. नामदेवांचे बालपण पंढरपुरात गेल्याचेही हया चरित्रात नमूद आहे.

परभणी जिल्हात नरसी येथे जन्म. ते पांडुरंगाचे मोठे भक्त होते. त्यांनी खुप अभंग लिहिले, ज्ञानेश्वरांचे समकालीन, ज्ञानेश्वर, चोखामेळा, सावता माळी यांच्याबरोबर तीर्थयात्रा, उत्तर भारतात बरीच वर्षे वास्तव्य, भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.

श्रीविठुरायाने आपल्या भक्ताचे गार्हाणे ऐकले विठुमाऊली प्रसन्न झाली. कार्तिका एकादशीला गोणईने एका सुदर बाळाला जन्म दिला. दामाजीशेठना खूप आनंद झाला. मोठया थाटाने त्यांनी बाळाचे बारसे केले. त्यांनी मुलाचे नाव ‘नामदेव‘ ठेवले.

पाळण्यात खेळतांना नामदेव आता सहा-सात वर्षाचा झाला. कधी कधी तो वडीलांबरोबर देवळात जाऊ लागला. देवापुढे हात जोडून डोळे मिटून उभा राहू लागला. एक दिवस दामाजीराव बाहेरगावी गेले हेते. गोणाईने नैवेद्याचे ताट तयार केले. नामदेवाला आईने हाक मारली. ‘नामदेव, जा राजा! आज देवाला नैवेद्य घेऊन जा!‘ ‘हो!‘ नामदेवाने मान डोलावली. आईने त्याला पितांबर नेसवला. कुणाची दृष्ट लागेल म्हणून गालबोट लावले अन् नैवेद्याचे ताट त्याच्या हाती दिले. नामदेव देवळाकडे निघाला. नामदेवाला आनंद झाला. ‘रोज बाबा नैवेद्य दाखवतात. आज आपण नैवेद्य दाखवू देवाला वा!‘

नामदेव देवळात आला. देवापूढे नैवेद्य ठेवला. डोळे मिटले. देवाची प्रार्थना केली आन हात जोडून तो उभ राहिला. काही वेळाने नामदेवाने डोळे उघडले. अन् बघतो तर काय? नैवेद्य आपला जशाच तसाच! नामदेवाला वाटले देव आपल्यावर रागवला. त्याने पुन्हा देवाला हात जोडले अन् म्हणाला, ‘बाबा आले नाहीत. मी नैवेद्य आणलास म्हणून तू रागवलास काय ? देवा, रोज बाबा नैवेद्य आणतात तेव्हा तू नैवेद्य खातोस अन् आज असं रे काय करतोस? देवा, तू नैवेद्य खाल्ला नाहीस तर मी मुळीच येथून हलणार नाही.‘
निश्चयपूर्वक नामदेवाने देवाला हाक मारली. ती लहानगी मूर्ती ही हात जोडून बसूनच राहिली. केविलवाण्या नजरेने मान कलती करून ती बाल नामदेवाची मूर्ती देवाकडे पाहू लागली. हळूहळू पाय दुखू लागले. कंटाळा आला, पण नामदेवाने मान हलविली नाही. देवाने नैवेद्य खाल्ला नाही तर येथून हालायचे नाही असा दृढ निश्चय केला. दीनांचा दयाळू कळवळला. तो देव श्यामसुंदर प्रकट झाला. नैवेद्याच्या ताटातील अन्नपदार्थ त्याने खावयास सूरूवात केली. देवदर्शनाने नामदेव आनदंला! मोठया भक्तीभावाने त्याने देवाला नमस्कार केला. देव भावाचा भूकेला! नामदेवाची भक्ती पाहून प्रत्यक्ष विटेवरील परब्रह्य विरघळले. नामदेवाने देवाजवळ हट्ट धरला. देवाने नैवेद्य खाल्ला!

नामदेवाचे संसारात लक्ष लागेना. सदोदित ‘विल विल‘ चालू असायचे त्यांचे गोणाई-राजाई रागावल्या. एक दिवस त्यांनी खूप बोलून घेतले त्यांना. म्हणल्या, देव करतो. देव करतो! म्हणून देवाला कष्ट पाडा. स्वतः तुम्ही काही करू नका अन देवाला झोजी वाहायला सांगा.‘

नामदेवाला फार लागले ते बोलणे. त्यांनी ठरविले काही तरी उद्योधंदा करायचा. त्यांनी तसे आईला सांगितले. दामाजी-गोमाईला आनंद झाला. दामाजीशेठची बाजारात पत चांगली होती. ते बाजारात गेले. त्यांनी निरनिराळया लोकांच्या गाठी घेतल्या. खुपसे कापड घरी घेऊन आले अन् नामदेवाला म्हणाले,
‘नामदेवा, चांगलं कापड मिळाल आहे. खूप फायदा होईल या व्यापारात. पण हे बघ, शक्य तो रोखीचाच व्यावहार कर. अन तारण घेतल्याशिवाय कुणलाही उधार माल देऊ नको.‘

‘बरं आहे!‘ नामदेव म्हणाले. त्यानी गाडी जोडली. गाडीत कापड भरले. विलाचे नाव घेतले अन निघाले बाजाराला. बाजाराच्या वाटेवर एक माळ होता. गाडी माळावरून जाऊ लागली. त्या माळावर उघडीनागडी माणसे वावरत होती. नागडी मुले-मुली हिंडत होती.

नामदेवाच्या ती नागडी मुलेबाळी दृष्टीस पडली. त्यांना गहिवरून आले. त्यांना वाटले ‘ही माण्से इथेच राहतात. रात्री खूप थंडी पडते. तेव्हा ती काय अंथरणार अन काय पांघरणार.‘

आपल्याजवळ आता कापड आहे. ते सर्व आपण यांना वाटून टाकू. त्यायोगे ते सुखावतील. नाहीतरी आपण सारी त्या एकाच देवाचीच लेकरं. त्यांचं सुख तेच आपलं सुख नामदेवाच्या मनातं! नामदेवाने गाडी थांबवली. ते खाली उतरले, त्यांनी त्या मुलांना जवळ बोलावले. त्यांच्याजवळ चौकशी केली. मुले कुणाशी बोलतात म्हणून त्यांचे आईवडील आले आणि थोडयाच वेळात नामदेवाभोवती कडेच केले तिथल्या माणसांनी! नामदेव त्यांच्या पुढार्‍याला म्हणला ‘गणोबा मी तुम्हाला सर्व कापड देणार आहे.‘‘देवा, आम्हाला काय करायचं कापड-चोपड? आम्ही आहोत तशी बरी आहोत.‘

‘का? तुम्हीला थंडी लागत नाही रात्रीची?‘
‘देवा, थंडी लागते, पण कपडा घायचा म्हणजे काय पैसे पडतात ना?‘
‘पण तुम्ही आता पैसे देऊ नका. मग तर झालं ना! हो, पण तारण द्यावं लागेल तुम्हाला‘
‘तारण? कसलं तारण देणार आम्ही? माळावरचे दगड देऊ फार झालं तर.‘
‘चालेल, दगडदेखील चालेल मला.‘

झालं! नामदेवांनी सर्वाना कापड वाटलं. त्यांचे सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यांनी नामदेवांना दुवा दिला. एक भलामोठा दगड नामदेवाच्या गाडीत ठेवून दिला. तो दगड घेऊन नामदेव घरी आले. मुखाने नास्मरण चालूच होते. घरी आल्यावर त्यांनी तो दगड नेऊन तिजोरीत ठेवला.

माजीशेठ(नामदेवाचे वडील) बाहेर गेले होते. घरी येताच त्यांनी विचारले,
‘काय, नामदेवा! कसा काय झाला व्यापार?‘ ‘फार, छान! सर्व कापड संपलं.
‘उत्तम, मग पैसे आणले असतील तेवढे ते दे! म्हणजे व्यापारांची देणी देऊ टाकतो.‘ दामाशेठ म्हणाले. ‘पैसे नाही आणले. सर्व माल तारण घेऊन दिले. गणोबा नाईकांना! त्यांना तारण धोंडोबांना दिलं आहे.‘ ‘अन् त्यांनी तारण काय दिलं? धोंडा ना? वा छान, फारच चांगलं तारण आहे ना काय? व्यापारांना काय मी दगड देऊ?‘ नामदेव कहीच बोलले नाहीत. ते मुकाटयाने खोलीत गेले. कुलूप उघडून त्यांनी तो धोंडा बाहेर काढला.

दामाजींच्या आपल्या डोळयावर विश्वास बसेना. तो सोन्याचा दगड पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. एवढे सोने कधी पाहिलेदेखील नव्हते त्यांनी. राजाई-गोणाई आ वासून पाहत राहिल्या. थोडा वेळ गेला आणि मग त्याचे भांडण सूरू झाले. नामदेव म्हणत, आपण फक्त आपल्या मालाचे पैसे घ्यायचे बाकींचं सोनं गणोबा नाईकांना परत द्यायचं.‘ छे, तसं कसं करायचं? त्याने आपल्या मालाबद्दल तर हे दिलं. आता सगळं आपलं!‘ त्यांच भांडण चालू असतांना लोक गोळा झाले. त्यांनी हे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. काही लबाड आणि लोभी लोक गणोबा नाईकांकडे गेले. त्याला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. अन् म्हाणाले, ‘गणोबा तू आता नामदेवाकडे जा. त्याला सांग की, तुझा मालाचे तेवढे पैसे काढून घे आणि उरलेल सोने दे ‘गणेबाला पुढे करूण लबाड लोक नामदेवाकडे गेले अन् नामदेवाला म्हणाले, ‘नामदेवा, हे गणोबा नाईक. त्याचं उरलेल सोनं ते परत मागत होते.

‘नामदेवांनी आपल्या मालाच्या किंमतीचे सोने काढून घेतले, ‘हे गणोबा, जा घेऊन तुमचं सोनं.‘ गणोबांनी सोने उचलले. माळावर येताच त्यांनी डोक्यावरचे सोने खाली उतरविले.पण…सोने कुठे ते? काळकुळकुळीत दगड होऊन पडला होता त्यांच्यासमोरं. देवाने न्याय दिला होता. संत नामदेवांच्या घराशेजारी एक ब्रा्रण राहत होता. तो पूर्वी दारिद्री होता. पण नतंर त्याने देवी लक्ष्मीची उपासना केली. देवी प्रसन्न झाली. तिने त्याला एक परिस दिला. अन् म्हणाली, ‘हा परिस तू लोखंडाला लावलास की त्याचे सोने होईल. तुझी इच्छा पूर्ण होईल!‘ ब्राणाचे दारिद्र पळाले. लोक त्यांच्या श्रीमंतीचा हेवा करू लागले. पण परिसाची प्राप्ती झाल्याने त्याने काही कुणाला कळू दिले नाही. एक दिवस राजाई (नामदेवाची आई) त्या ब्राणाच्या घरी गेली.

त्यावेळी ब्राणाची बायको कमळजा ही घरी होती. तिला फार लोभ वाटे या कुटूंबाविषयी. तिने राजाईची हकीकत विचारली. आपली दारिद्रयाची कहाणी राजाईने तिला सांगितली. कमळजाला राजाईची दया आली. आपल्या खोलीत जाऊन तिने परिस आणला अन् तो परिस राजाईला देऊन म्हणाली. ‘बाई, हा परिस मी तुम्हाला देते आहे. लोखंडाचे या परिसाने खूप सोने करून घ्या अन् माझा परिस लवकर परत आणून द्या.‘

राजाई घरी गेली. तिने घरातील भांडयांना, लोखंडाला परिस स्पर्श करून सोने केले. ते सगळे सोने घरात लपवून ठेवले. मग थोडे सोने घेऊन ती बाजारात गेली. धान्य, किराणा वगैरे घेऊन परत आली. नंतर ती परिस परत करण्यासाठी निघली. तेवढयात नामदेव आले. नामदेवांना पाहून राजाई कमळजाडके न जाता माघारी वळली. राजाईची घागरलेली मुद्रा व अन् घरातला थाटमाट पाहून नामदेवाला संशय आला, ‘काय गडबड आहे आज घरात?‘ राजाई दादपत्ता लागू देईना. नामदेवांनी तिचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी तिला खोदूनखोदून विचारल. शेवटी नाईलाजाने राजाईने नामदेवांना सर्व काही सांगितले.

नामदेवांनी राजाईजवळून तो परिस मागून घेतला. अन् श्रीविलाचे नास्मरण करीत ते चंद्रभागा नदीवर आंघोळीसाठी गेले.

नामदेवाला जाऊन थोडा वेळ झाला. तोच ब्राण स्वतःच्या घरी आला. त्याने आंघोळ केली अन् तो पूजेसाठी बसला. परिसाचादेखील तो देवाबरोबर पूजा करीत असे. त्याने आपल्या पत्नीस पूजेसाठी परिस आणण्यास सांगितले. तिला ब्रम्हांड आठवले. आता परिस कोठून आणून देणार? ती अळमटळम करू लागली. ब्राणाने तर निकड लावली. शेवटी तिला सर्व सांगणे भाग पडले. ब्राण खूपच रागावला.

कमळजा राजाईकडे आली. तिने राजाईकडे परिस मागितला. तीही मोठया संकटात सापडली. मोठया विश्वासाने ब्राण पत्नी कमळाजाबाईनी आपल्याला परिस दिला. होता. आपले दारिद्र दूर व्हावे असे तिला वाटत होते. पण आपण योग्य वेळी परिस परत केली नाही. आता तर आपल्याजवळ परिस नाही. नामदेव परिस घेऊन, नदीवर गेल्याचे राजाईने कमळजाबाईला सांगितले. बिचारी ब्राणपत्नी! तिने तो निरोप नवर्‍याला सांगितला. ब्राण खूपच रागावला. त्याने बायकोला खूप बोलून घेतले अन् तो नदीकडे धावत सुटला. तो काय धावतो? म्हणून आणखी काही लोक त्याच्या मागून धावू लागले. नदीत नामदेव आंघोळ करीत होते. मुखाने विठ्ठलाचे नामस्मरण करीत होते. ब्राण तेथे पोहोचला आणि म्हणाला, ‘नामदेवा माझा परिस मला परत द्या पूजेला खोळंबा होतो आहे.

‘नामदेव म्हणले, ‘कसला परिस? मी तर तो दगड नदीत टाकून दिला.‘ आजूबाजूचे लोक गंमत पाहत होते. कुणी म्हणाले ‘हा नाम्या लबाड बरं का!‘ त्याने परिस लपवून ठेवला असेल! परिस काय कोणी नदीत टाकून देते काय?‘ ‘हे पहा नामदेवा! उगीच ढोंग करू नकोस. खोटे बोलू नकोस. परिस कोणता शहाणा माणूस नदीत टाकीलं बरं!‘ ‘तुम्हाला वाटत असेल खोटे आहे तर नदीत उतरून पाहा!‘ नामदेंवाचे वरील बोलणे एकूण सगळे लोक हसू लागले. बुडी मारून नदीच्या तळाशी जाणार कोण? अन् तळ गाठला तरी पाण्याच्या तळाशी किती दगडं. त्यातून परिस कसा शोधून काढणार? तोच नामदेवांनी पाण्यात बुडी मारली. ओंजळभर दगडं घेऊंन ते वर आले आणि ब्राणाला म्हणाले, ‘हे घ्या तुमचे परिस!

‘लोकांना हे ऐकून चेष्टा वाटली. इतक्यात एकाने आपल्या जवळच्या लोखंडी टाचण्या काढल्या. त्या त्याने सर्व दगडांना लावून पाहिले. सर्व टाचण्या सोन्याच्या झाल्या. सारेच दगड परिस होते. ब्राण ओशाळला. त्याने संत नामदेवांचे पाय धरले. सगळया लोकांनी एकच गजर केला.‘संत नामदेव महाराज की जय! पुंडलिक वरदा हरी विठ्ठल महाराज की जय.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

## Sant Namdeo ; Sant Namdev

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*