सरनाईक, अरुण

Arun Sarnaik

अरुण शंकरराव सरनाईक (४ ऑक्टोबर, इ.स. १९३५[१] – १४ मार्च इ.स. १९९८) हा मराठी चित्रपट-अभिनेता होता. त्याने मराठी चित्रपट व नाटकांतून अभिनय केला. इ.स. १९६१ सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातील पूरक भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले.

हिंदुस्तानी संगीतातील ख्यातनाम गायक निवृत्तीबुवा सरनाईक त्याचे काका होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

https://www.marathisrushti.com/articles/arun-sarnaik/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*