नंदकिशोर कलगुटकर

मराठी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख

नंदकिशोर कलगुटकर हे अनेक मराठी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख होते. कलगुटकर यांनी विशेषतः दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, मुका घ्या मुका, सासरचं धोतर आदी मराठी आणि तेरे मेरे बीच में, आगे की सोच अशा हिंदी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम पाहिले.

शापित, पुढचं पाऊल, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, माझा पती करोडपती, सवत माझी लाडकी, छक्के पंजे, धुमाकूळ, बंडलबाज, एकापेक्षा एक, घाबरायचं नाही, शेजारी शेजारी, जीवा सखा, अनुराधा, लपंडाव या मराठी चित्रपटांची प्रसिद्धीही त्यांनी सांभाळली.

७०, ८०, ९० च्या दशकातील अनेक चित्रपटांची प्रसिद्धी त्यांनी केली. चित्रपटविषयक बातमी रंगतदारपणे लिहिण्याचा पायंडाही त्यांनी पाडला.

नंदकिशोर कलगुटकर यांचे मुंबईतील मालाड येथील निवासस्थानी २० ऑगस्ट २०१९ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.

## Nandkishor Kalgutkar
## Publicist of Marathi Movies

(Last Updated on : 23 Aug 2019)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*