डॉ. रामदास गुजराथी

मुंबई ग्राहक पंचायतचे विश्वस्त

डॉ. रामदास गुजराथी हे २५ वर्षांहून अधिक काळापासून ग्राहक संरक्षण क्षेत्रात कार्यरत होते. ते मुंबई ग्राहक पंचायतचे विश्वस्त व अध्यक्ष होते.

डॉ. गुजराथी हे सन १९८५ पासून ग्राहक चळवळीशी जोडलेले होते. सुरुवातीच्या काळात संस्थेच्या बोरिवली विभागाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व मागील दहा वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष या नात्याने ते धुरा सांभाळत होते.

डॉ. गुजराथी यांनी बोरिवलीतील गोखले कॉलेजचे संस्थापक प्राचार्य म्हणून सन १९७९ ते १९९९ अशी तब्बल २० वर्षे सेवा केली.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, बोरिवलीतील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते अखेरपर्यंत कार्यरत होते.

वाणिज्य विषयातील १८ पुस्तके त्यांनी मराठी व इंग्रजीत लिहिली आहेत. अखिल भारतीय वाणिज्य व व्यवस्थापन परिषदांमध्ये त्यांनी २५ शोधप्रबंध सादर केले आहेत.

डॉ. रामदास गुजराथी यांचे शुक्रवार दि. २३ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई येथे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.

## Dr Ramdas Gujrathi

संदर्भ – वृत्तपत्रांतील बातमी

(Last Updated on : 23 Aug 2019)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*