हर्षवर्धन नवाथे

‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात `केबीसी'चा पहिला विजेता

‘कौन बनेगा करोडपती’ हा भारतीय टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय शो. या रिअॅलिटी शोने आजवर अनेकांचं आयुष्य बदललं. ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी हा शो देतो आणि त्यातूनच सर्वसामान्यांचं आयुष्य बदललं.

केबीसीचा पहिला विजेता कोण होता हे आज फार क्वचित लोकांना माहित असेल. १९ वर्षांपूर्वी केबीसीमध्ये भाग घेतलेले मराठमोळे हर्षवर्धन नवाथे हे त्यावेळी विद्यार्थी होते. या शोमध्ये करोडपती बनल्यानंतर रातोरात ते स्टार झाले. त्यावेळी ते UPSC परीक्षेसाठी तयारी करत होते. पण केबीसी जिंकल्यावर त्यांनी ती परीक्षा दिली नाही. केबीसीमध्ये जिंकलेली रक्कम त्यांनी पुढील अभ्यासासाठी वापरली. परदेशात जाऊन एमबीएचं शिक्षण घेतलं.

१९ वर्षांनंतर आता ते महिंद्रा अँड महिंद्रामध्ये CSR आणि एथिक्स डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत. या कंपनीत ते २००५ पासून काम करत आहेत. त्यामुळे कॉर्पोरेटमध्ये राहूनही एकाप्रकारे ते सामाजिक सेवेसाठीच काम करतायत.

केबीसीचा पहिला विजेता झाल्यावर त्यांना मॉडेलिंगसाठीही खूप ऑफर्स आल्या होत्या. टीव्हीमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम करण्यासाठीही विचारण्यात आलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना मुख्य पाहुणे म्हणून बोलवले जायचे.

 

## Harshvardhan Nawathe

## First KBC Winner

(Last Updated on : 25 August 2019)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*