जोशी, (डॉ.) मधुसुदन

डॉक्टर मधुसुदन जोशी हे पनवेलमधील नावाजलेले वैद्यकिय तज्ञ असुन गेली दहा वर्षे त्यांनी, त्यांच्या क्लिनीकची पायरी चढणार्‍या कुठल्याच रूग्णाला निराश होवून पाठवले नाहीये. इतकी वर्षे या व्यवसायात असल्यामुळे समृध अनुभवांची व विवीध वैद्यकिय कौशल्यांची पोतडीच त्यांच्याजवळ जमा झाली आहे. तत्पर सेवा, व त्यांच्या हाताला कुठलाही आजार त्वरीत ओळखून त्यावर रामबाण औषधोपचार करण्याची चांगली पारख असल्याने आपले रूग्ण त्यांनी कधीच कमी होवून दिले नाहीत. वैद्यकीय पेशा हा त्यांनी व्यवसाय म्हणून नव्हे तर दुर्बलांची सेवा करण्याच्या हेतूने स्वीकारला असल्यामुळे कधी तरी व्यावसायिक चौकटींच्या बाहेर पडून देखील आपल्या रूग्णाला हर प्रकारची मदत करण्यास ते नेहमी तयार असतात. त्यामुळे त्यांच्या क्लिनीकमध्ये सदैव रूग्णांची रीघ लागलेली असते. आपले वैयक्तिक क्लिनीक चालवता चालवता ते मुंबईतल्या कित्येक समाजसेवी संस्थांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे वैयक्तिक क्लिनीकचे रूग्ण सांभाळून अशा संस्थांना नियमीत किंवा आठवडयातून एकदा दोनदा भेटी देणे, तिकडच्या सदस्यांच्या आरोग्याची विचारपुस करणे, त्यांच्या विवीध आजारांवर उपचार सुचविणे व गरज लागली तर प्रत्यक्ष करणे, अशी तारेवरची कसरत सदैव करण्यात त्यांना कसलही वावगं वाटत नाही. प्रत्यक्ष समाजकार्यातही ते आपापल्या पध्दतीने तर कधी मित्रांसोबत काम करून खारीचा वाटा उचलतात. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1973 मध्ये झाला. मधुसुदन जोशी यांचे वडिलदेखील डॉक्टर असल्याने वैद्यकिय पेशा हा त्यांच्या रक्तात भिनला आहे असे म्हणावयास हरकत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*