मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

अवचट, संदीप

संदीप अवचट हे नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत. […]

जगताप, (प्रा.) बापुराव

प्राध्यापक बापुराव जगताप हे प्रख्यात नामांतरवादी नेते, लेखक, व निळ्या पहाडीवरच्या कवितांचे जनक असे अष्टपैलु व्यक्तिमत्व होते. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी व गाढे आभ्यासक असलेले जगताप हे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या तत्वप्रणालीशी एकनिष्ठ राहिले. औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून प्रा. बापुराव जगताप हे मराठी विभागप्रमुख म्हणून 2001 साली निवृत्त झाले होते.
[…]

यज्ञोपावित, किरण

किरण यज्ञोपावित हा मराठीमधील ताज्या दमाचा दिग्दर्शक आहे., व तजेलदार चित्रपटांद्वारे रसिकांचे निखळ मनोरंजन करून काही लोकांच्या जीवनातील जळजळीत वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही त्याची शैली आज मराठी रसिकांच्या मनाला चांगलीच भिडलेली दिसते. चिंचवडमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या किरणला लहानपणापासूनच नाटक बघण्याची विलक्षण आवड होती. तरूणपणी प्रायोगिक रंगभुमीमध्ये चपखल बसणार्‍या अनेक चित्रपट, नाटके, लघुनाटके, व छोट्या मोठ्या जाग्रुतीपर स्किट्ससाठी संहितालेखनाचे काम त्याने केले होते.
[…]

नारळीकर, (डॉ.) जयंत विष्णू

जयंत नारळीकर हे त्यांच्या रोचक, रसदार, व सर्वांच्या मनाला भिडेल अशा लेखनशैलीत आकाशातील गुढ तारे व ग्रहांच्या गोष्टी सांगणारे लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. अनेक वैचारिक, वैज्ञानिक, तांत्रिक, काही समजायला सोप्या व काही तर लहान मुलांनाही वाचायला उपयुक्त अशा कथांमधून ते आपल्या सर्वांशी हितगुज साधत असतात.
[…]

कोसंबी, दामोदर धर्मानंद (डीडी)

असं म्हणतात की देवाने माणसाला काही विशीष्ठ विषयांमध्ये गती दिलेली आहे, व काहींमध्ये अधोगती. परंतु काही हिरे असे असतात, की जीवनातील अनेक क्षेत्रे व नाण्याच्या दोन्ही बाजू उत्तमपणे हाताळण्याची कला त्यांना उत्तम अवगत असते. एकाच गोष्टीला प्राधान्य द्यावे किंवा एकाच क्षेत्रात पुर्णपणे बुडून, त्यात भव्य दिव्य असे काहीतरी मिळवावे असली तत्वे त्यांना कधीच रूचत नाहीत. जीवनाच्या विवीधांगी विचारधारांमधे, मतप्रवाहांमधे, किंवा कलाकौशल्यांमधे सतत डुबकी मारण्याचा त्यांचा स्वभावच असतो व त्यांच्यासमोर पसरलेल्या विभीन्न व्यावसायिक, तांत्रिक, माहिती, संशोधन, कला, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांच्या जाळ्यामध्ये ते तितक्याच तन्मयतेने व आत्मीयतेने काम करीत असतात. अशाच एका अत्यंत चळवळ्या व विज्ञानाच्या विवीध वाटा कोळून प्यायलेल्या संशोधकाचे नाव म्हणजे दामोदर कोसांबी.
[…]

सदानी, हरीष

स्त्रियांच्या प्रश्नांविषयी अनेक स्त्री संघटना काम करताना दिसतात. पुरुषांनाही स्त्रियांपासून कायद्याने संरक्षण देण्यासाठी सध्या दबावगट तयार होतो आहे. मात्र या परिस्थितीत स्त्रियांच्या संरक्षणासाठी व त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी पुरुषांनी तयार केलेली मावा (मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अ‍ॅब्युज) ही संस्था अपवादात्मक ठरावी. एकमेकांचा आदर करीत, व एकामेकांबद्दलचा विश्वास वृध्दिंगत करून स्त्री-पुरुषांना सहजीवन जगता यावे यासाठी अंधेरीतील ही संस्था काम करते. विश्वस्त म्हणून या संस्थेचे काम करणार्‍या हरीष सदानी यांना महाराष्ट्र फाउण्डेशनने पुरस्कार देऊन त्यांच्या सेवेला गौरविले आहे.
[…]

मनोहर, (डॉ.) प्रियदर्शन

डॉक्टर प्रियदर्शन मनोहर हे एक प्रतिभावंत मराठी लेखक आहेत. त्यांच वास्तव्य हे परदेशात असून सध्या ते मराठी मंडळ या पिटसबर्ग या संस्थेसाठी लेखक म्हणुन काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या विपुल लेखनाला अमाप प्रसिध्दी मिळाली असून त्यांच्याभोवती गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिध्दीच एक वलयच निर्माण झालय. सातासमुद्रापल्याड, मराठीचा कलात्मक तसेच वैचारिक प्रसार व प्रचार करणारा हा गुणी कलाकार, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या वेगळ्या व स्वतंत्र लेखनशैलीची रसिकांवर छाप पाडण्यात विलक्षण यशस्वी ठरला आहे लघुकथा हा जरी प्रियदर्शनांचा आवडता प्रांत असला तरी सांगितीक नाटकांच्या लेखना व सादरीकरणापासून ते विनोदी, मनोरंजन कथा लिहीण्यापर्यन्त सार्‍याच गोष्टी त्यांना उत्तम जमतात. संसार व्हर्जन 2 हा त्यांनी सादर केलेला अतिशय रंजक असा सांगितीक एकपात्री प्रयोग चांगलाच गाजला. त्यांनी लिहीलेल बहुतांशी साहित्य हे मराठी मंडळातर्फेच प्रकाशित केल जात. त्यांच्यामधील अष्टपैलु, काहीसा भावनाप्रधान पण तेवढाच मिश्कील असा लेखक वाचकांमध्ये चांगलाच रूजला असून त्यांच्या यशाच हेच तर गमक आहे.
[…]

सावरकर, विश्वासराव

स्वा. सावरकर- नेताजी सुभाषचंद भेट, स्वा. सावरकर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट, स्वा. सावरकर- गाडगे महाराज भेट, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिराची स्थापना, स्वातंत्र्यवीरांचे दलितोद्धाराचे कार्य तसेच गांधीहत्येनंतर घडलेल्या अनेक घटना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या विश्वासरावांनी बर्‍याच प्रमाणात लिखाणही केले आहे. ते एका मोठ्या, प्रदिर्घ व ऐतिहासीक कालखंडाचे महत्वपुर्ण व एकमेव साक्षीदार होते.

‘आठवणी अंगाराच्या’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण टिपणारे त्यांचे हे पुस्तक चांगलेच गाजले होते.
[…]

पांगे, शुभांगी

मुंबई मराठी साहित्य संघाने आठ नोव्हेंबरला चार वाड्:मयीन पुरस्कार प्रदान केले. त्यातला वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार येशू पाटील यांच्या ‘शब्द पब्लिकेशन्स’ ला; ‘मंगेशराव नारायण कुलकर्णी पुरस्कार’, गंथप्रसारक व अभ्यासक शशिकांत सावंत यांना; ‘केशव भिकाजी ढवळे पुरस्कार’ शुद्धलेखन चळवळ्ये अरुण फडके यांना तर ‘बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार’ ‘मॅजेस्टिक प्रकाशना’च्या आधारस्तंभ शुभांगी पांगे यांना देण्यात आला. पाच हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र असा हा पुरस्कार मिळवणार्‍या या चौघांपैकी पहिल्या तिघांची नावे कधी ना कधी कानांवर पडतात. पण शुभांगी पांगे या कायमच पडद्याआड राहिलेल्या वाड्:मयसेवक आहेत. त्यांची मराठी साहित्य आणि व्यवहार यांवरची निष्ठा इतकी प्रखर की, बी ए आणि एम ए केल्यानंतर याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या या वाड्:मयसेवेला लवकरच तीन दशके पुरी होतील.
[…]

भवाळकर, (डॉ.) तारा

लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांचं वर्णन ‘माय’वाटेवरची प्रवासिनी असंच करावं लागेल. कारण ‘लोकसंस्कृती’ ही व्यापक अर्थाने ‘माय’ म्हणजेच ‘मातृपरंपरा’ असल्याचं त्यांनी आपल्या लेखनातून वारंवार सिद्ध केलं आहे. ताराबाईंचं आजवरचं लोकसाहित्यविषयक लेखन वाचल्यावर महाराष्ट्रीय किंवा एकूणच भारतीय स्त्रीमन नव्यानं उलगडतं. बाईंनी लोकसाहित्याचे संशोधन करताना संकलित केलेल्या लोकगीत-लोककथांचा अन्वय लावून त्यांनी या सार्‍यांची सैध्दंतिक मांडणी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्यांना मिळालेली ‘महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळा’ची सन्मानवृत्ती योग्यच आहे. […]

1 40 41 42 43 44 57