मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

चिटणीस, अशोक सिताराम

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदीराचे ३० वर्षं प्राचार्य म्हणून कार्यभार वाहिलेल्या अशोक चिटणीस यांनी शिक्षण विषयक, साहित्यविषयक, सांस्कृतिक अशा अनेक कार्यक्रमांचे संयोजन केले आहे.
[…]

केळुसकर, (डॉ.) महेश वासुदेव

मराठी साहित्यक्षेत्रात आपल्या कवितांनी एक वेगळा ठसा उमटवलेले कवी डॉ. महेश वासुदेव केळूसकर हे ही ठाण्याचेच रहिवासी आहेत. मुळचे सिंधुदुर्गचे असणारे केळूसकर ठाण्यातील साहित्य – सांस्कृतिक क्षेत्रात ग्रंथालय चळवळीसाठी भरीव योगदान देत आहेत.
[…]

जाईल, नारायण जनार्दन

स्थापत्यशास्त्रातील पदवी, कोयना प्रकल्प, अवजड अभियांत्रिकी प्रकल्प (रांची), उद्योग मंत्रालय (नवी दिल्ली) असे अभियांत्रिकी क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले नारायण जनार्दन जाईल यांना ठाणं ओळखतं ते त्यांच्या लेखनामुळे.
[…]

चिटणीस, (डॉ.) शुभा अशोक

हिंदी विषयात एम.ए.पी.एच.डी. करणार्‍या मुंबई विद्यापीठात आणि बेडेकर महाविद्यालयात २५ वर्षं अध्यापनाचे कार्य करणार्‍या; तसंच नियतकालिकं, वृत्तपत्र यांतून सातत्याने लेखन करणार्‍या डॉ. शुभा चिटणीस या ठाण्यातील एक यशस्वी व्यक्तिमत्व !
[…]

आठवले, शांताराम

दहा चित्रपटांतील साध्या सोप्या शब्दातल्या परंतु अर्थपूर्ण गीतांमुळे शांताराम आठवले यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या गीतांमुळेच अनेक चित्रपट यशस्वी झाले, चित्रपटरसिकांनी त्यांच्या गीतांसाठी चित्रपट पाहिले, समीक्षकांनीही त्यांची गीते नावाजली.
[…]

सुधीर मोघे

निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची अनोखी शैली होती. पण त्यांची आणखीन एक ओळख महाराष्ट्राला होती ती म्हणजे प्रतिभावान साहित्यिक म्हणून; कविता, गीतकार, ललितकार, पटकथा -संवाद लेखक,गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, या क्षेत्रात संचार होता.
[…]

पाटील, शरद (कॉम्रेड)

प्राच्यविद्यापंडित, आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि कृतीशील सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ख्याती असलेल्या शरद पाटील हे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होते.१९४५ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथील शिक्षण अर्धवट सोडून कम्युनिस्ट चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
[…]

देशमुख, गोपाळ हरी

सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, मृत्यू : पुणे ऑक्टोबर ९ इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.
[…]

पटवर्धन, (डॉ.) माधव त्र्यंबक (माधव जूलियन)

माधव जूलियन हे मराठी कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य देखील होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो. […]

राम गबाले

राम गबाले यांनी मुंबई व दिल्ली दूरदर्शनसाठी शंभराहून अधिक अनुबोधपट, व्हिडिओ फिल्म्स, मालिका आणि टेलिफिल्मशी निर्मितीही त्यांनी केली होती. निर्माता आणि लेखक या नात्याने ते या माध्यमाशी निगडित होते. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांना ‘गांधी’ या चित्रपटासाठी नियोजन करण्यासाठी त्यांनी विशेष सहकार्य केले होते. “
[…]

1 36 37 38 39 40 57