भाऊराव कोल्हटकर

पूर्ण नाव लक्ष्मण ऊर्फ भाऊराव बापूजी कोल्हटकर. मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट भाऊराव यांचा बडोदे येथे ९ मार्च १८६३ रोजी जन्म झाला. बापूबोवा कोल्हटकर हे त्यांचे पिता व सौ. भागीरथीबाई ही माता. भाऊरावांचे शिक्षण कारकुनी करण्यापुरते झाले होते. बडोदे येथील पोलीस आयुक्तांच्या कचेरीत ते साधे कारकून असले तरी एक उत्कृष्ट गायक म्हणून त्याकाळी बडोद्यात त्यांची फार प्रसिध्दी होती. सुंदर रूप आणि गोड आवाज हे त्यांचे गुणविशेष.

अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० रोजी संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करून संगीत मराठी रंगभूमीची स्थापना केली. त्या काळात नाटकातील स्त्रीभूमिका पुरूष करीत. आपल्या नाटकातील स्त्रीभूमिका करण्यासाठी अण्णासाहेबांनी भाऊरावांची निवड केली आणि २० सप्टेंबर १८८२ रोजी भाऊरावांनी वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला.

त्याकाळी किर्लोस्करांच्या शाकुंतल नाटकात ‘शकुंतला‘ (१८८२) सौभद्र नाटकात ‘सुभद्रा‘ (१८८२) व रामराजयवियोग नाटकास ‘मंथरा‘ (१८८४) या भाऊरावांच्या स्त्रीभूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या.

‘सुभद्रे‘ची भूमिका तर त्यांनी १८८३ ते १८९७ या चौदा वर्षांच्या काळात अखंडपणे केली. महाराष्ट्रातील घराघरांतून त्यांच्या नावाचा उल्लेख आत्मीयतेने ‘भावडया‘ असा होऊ लागला.

ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक व चित्रकार कृष्णदेव मुळगुंद

जुन्या पिढीतील बुजुर्ग नृत्यदिग्दर्शक, चित्रकार आणि बालनाटय लेखक पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कृष्णदेव मुळगुंद हे सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व होते. कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म.

२७ मे १९१३ रोजी झाला. लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्याने ते जे, जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी.डी. आर्ट झाले. उमेदवारीच्या काळातच ते नृत्याकडे ओढले गेले. उद्यशंकर यांनी बसविलेले प्रयोग पाहून ते प्रभावित झाले आणि पुढे आयुष्यभर त्यांनी उद्यशंकर यांना गुरुस्थानी मानून एकलव्याप्रमाणे नृत्यसाधना केली.

१३ फेब्रुवारी १९०१ रोजी त्यांचे निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*