युनायटेड किंग्डम

ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.

युनायटेड किंग्डम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे. तसेच, ते युरोपियन संघाचे संघराज्य आहे, व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहे. युनायटेड किंग्डम हे राष्ट्रकुल परिषद, जी-८, नाटो इत्यादि अंतर्राष्ट्रीय संस्थांचे सदस्य राज्य आहे.

युनायटेड किंग्डम हा असा देश आहे की ज्याची सीमा फक्त दुसर्‍या एकाच देशासोबत आहे. युनायटेड किंग्डमच्या उत्तर आयर्लंड देशाच्या नैऋत्येला आयर्लंड हा देश आहे व इतर सर्व बाजुंनी समुद्र आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :लंडन
अधिकृत भाषा :इंग्लिश, आयरिश, उल्स्टर स्कॉट्स, स्कॉटिश गाएलिक, स्कॉट्स, वेल्श, कोर्निश
राष्ट्रीय चलन :पाउंड स्टर्लिंग

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*