अमेरिकेची संयुक्त संस्थाने (USA)

उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स Eng:United States) या नावाने ओळखला जातो.

अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली ‘अध्यक्षीय लोकशाही’ आहे. अमेरिकेची राजधानी ‘वॉशिंग्टन डी.सी.’ येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो.भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.

अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे.

अमेरिकन डॉलर अमेरिकेचे चलन आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :वॉशिंग्टन डी.सी., न्यूयॉर्क शहर
अधिकृत भाषा :इंग्लिश
राष्ट्रीय चलन :अमेरिकन डॉलर (USD)

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*