श्रीपेरुम्बुदुर

श्रीपेरुम्बुदुर हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. चेन्नईपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे. सुप्रसिद्ध वैष्णव संत रामानुज यांची ही जन्मभूमी असून, देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची याच शहरातील एका सभेत ‘एलटीटीईच्या आत्मघातकी पथकातील सदस्यांकडून हत्या करण्यात आली होती.

औद्योगिक शहर
श्रीपेरुम्बुदुर हे शहर २000 सालापासून एक मोठे औद्योगिक शहर म्हणून नावारूपास आले आहे. इथे असलेला सेझ, तसेच अगदी जवळ असलेले चेन्नई बंदर व मोठ्या प्रमाणात कुशल कामगारांची उपलब्धता यांमुळे अनेक मोठ्या कंपन्या येथे येत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*