श्रीकाकुलम हे उत्तरपूर्व आंध्र प्रदेशातील एक ऐतिहासिक शहर आहे. निझामाच्या राजवटीत या शहराचे नाव गुलशनाबाद असे होते. पुढे ब्रिटिश काळात या शहराचे नाव चिकाकोल असे करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर शेवटी या शहराचे नाव श्रीकाकुलम असे झाले. पूर्वी ओरिसा राज्यातल्या गजपती नावाच्या संस्थानचा या शहरापर्यंत विस्तार होता. त्या संस्थानचे श्रीकाकुलम हे एक वसुलीचे ठाणे होते.
बगिचांचे शहर
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ वर श्रीकाकुलम वसलेले असून, अनेक बगिचे या शहरात आहेत. येथील नागावली नदीच्या किनाऱ्यावर असणारे अय्यप्पा स्वामी मंदिर, कल्याणवेंकटेश्वरा स्वामी मंदिरही प्रेक्षणीय आहे.
Leave a Reply