महबूबनगर

महबूबनगर हे आंध्र प्रदेशातील एक मोठे शहर आहे. स्थानिक भाषेत या शहराला ‘पालमुरु’ व ‘रुकमम्मापेटा’ अशी नावे होती. मात्र, हैदराबादचे निजाम ‘मीर महबूब अली खान, असफ जह वी’ यांच्या स्मरणार्थ ४ डिसेंबर १८९० रोजी या शहराचे नाव महबूबनगर असे करण्यात आले. येथे जिल्हा मुख्यालय व अनेक सरकारी कार्यालये आहेत. हैदराबादपासून ते १०० किमीवर आहे.

तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरील शहर
कन्याकुमारी-वाराणसी या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर असलेले महबूबनगर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. देशभरातील शहरांशी महामार्गामुळे ते जोडलेले असून हैदराबाद येथून रेल्वेनेही तेथे जाता येते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*