स्लोव्हेनिया

स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक (स्लोव्हेन: Republika Slovenija) हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लियुब्लियाना ही स्लोव्हेनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

ऐतिहासिक काळात रोमन व पवित्र रोमन साम्राज्यांचा भाग असलेल्या स्लोव्हेनियाने १९१८ साली पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रिया-हंगेरी पराभूत झाल्यानंतर सर्बिया व क्रोएशियासह नव्या राष्ट्राची निर्मिती केली जे लगेचच युगोस्लाव्हियाचे राजतंत्र बनले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांनी स्लोव्हेनिया भागावर आक्रमण केले होते. ह्याच काळात युगोस्लाव्हिया देशाची स्थापना झाली व पुढील सुमारे ५० वर्षे स्लोव्हेनिया हे युगोस्लव्हियामधील एक गणराज्य होते. १९९१ सालच्या युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर स्लोव्हेनिया स्वतंत्र देश बनला.

सध्या स्लोव्हेनिया युरोपील एक प्रगत व समृद्ध देश आहे. २००४ साली स्लोव्हेनियाला नाटो व युरोपियन संघात प्रवेश देण्यात आला तर २००७ साली युरोक्षेत्रामध्ये सहभागी होणारा स्लोव्हेनिया हा पहिला भूतपूर्व कम्युनिस्ट देश होता. २०१० साली स्लोव्हेनिया आर्थिक सहयोग व विकास संघटनेचा सदस्य बनला.

राजधानी व सर्वात मोठे शहर :लियुब्लियाना
अधिकृत भाषा :स्लोव्हेन
राष्ट्रीय चलन :युरो

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*