नेपाळ

नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर आहे. नेपाळ हे जगातील तीन हिंदू बहुल राष्ट्रांपैकी एक आहे. नेपाळ हे हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात ९३ वा क्रमांक असून लोकसंख्येच्या दृष्टीने ४१ वा क्रमांक आहे. नेपाळ हा जगातला एकमेव असा देश आहे ज्या देशाचा राष्ट्रध्वज हा आयताक्रुती नाही. काठमांडू नेपाळची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे.

काठमांडू भागात सुमारे ५० लाखांची वस्ती आहे. नेपाळ भौगोलिकदृष्ट्या संपन्न प्रदेश आहे. उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातील सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, (नेपाळी : सगरमाथा) नेपाळमध्ये आहे. समुद्रसपाटीपासून २०००० फूट (६०९६ मीटर) उंचीवरील सुमारे २४० पर्वतशिखरे आहेत. दक्षिण नेपाळमध्ये जमीन शेतीसाठी अतिशय समृद्ध असल्याने दाट लोकवस्तीचा शहरी भाग अधिक आहे.

नेपाळमधील सुमारे ८०% लोक हिंदू असून टक्केवारीच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्येचा देश आहे. नेपाळी जातींचा विचार केला तर येथे ३० प्रकारचे गट आढळतात. त्यात-क्षेत्री (पहाडी क्षत्रिय), बाहुन (पहाडी ब्राह्मण), मगर, थारू, नेवार, गुरुंग, तामाङ, किराँत राई, लिंबू, यादव, शेर्पा, नेपाळी मियाँ, इत्यादींचा समावेश होतो. नेपाळी कामकाज देवनागरी लिपीत चालते. पण त्यांच्या लिपी व भाषेत ३० बोली आहेत. मात्र ‘नेवारी’ ही काठमांडूमध्ये प्रमुख भाषा आहे. नेपाळमध्ये जगातील १४ उंच शिखरांपैकी ८ आहेत. ही सर्व शिखरे ८००० मीटरपेक्षा उंच आहेत. मावूंट एवरेस्ट शिखर ८८५० मीटर उंचीचे येथेच आहे. याला सागर माथा म्हणतात. हवामान पाहता नोव्हेंबर ते मार्च काठमांडू थंड असते.

जानेवारी मध्ये मात्र कमालीची थंडी असते. एप्रिल ते जुने ३२ डिग्री सेल्सिअस तापमान असते. जून –जुलै मात्र येथे संपूर्ण पावसाळा असतो. इतर महिन्यात मात्र हवामान उत्तम असते.सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत इथली कार्यालये चालतात आणि शनी-रवी त्यांना सुटी असते. इथले , ९०% लोक शेती आणि पर्यटन उद्योगावर आपली गुजराण करतात.यातूनच ते परकीय चलन मिळवतात. त्यांचे दर डोई २१० यु.एस .डॉलर म्हणजे १०,५००/-रुपये उत्पन्न आहे. बौद्ध धर्माचे येथे सुमारे १५% आहे, बौद्ध लोक जरी अल्पसंख्य असले तरी नेपाळशी बौद्ध धर्माचे दृढ आणि अतूट नाते आहे. नेपाळमध्ये बहुतांश वेळा राजेशाही होती. १७६८ पासून शाह घराण्याची राजवट होती. राजा पृथ्वी नारायण शाह यांच्या राजवटीमध्ये अनेक छोट्या स्वतंत्र राज्यांना एकसंध नेपाळमध्ये समाविष्ट केले गेले.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी) च्या नेतृत्वाखाली सुमारे दहा वर्ष चाललेल्या लोकचळवळीचा आणि नेपाळमधील प्रमुख राजकीय पक्षांनी सतत काही आठवडे केलेल्या संपानंतर अखेर २२ नोव्हेंबर, २००५ रोजी एक १२ कलमी मसुदा तयार करण्यात आला. २८ मे, २००८ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात राजे ज्ञानेंद्र यांच्या विरोधात मतदान करून संघीय लोकतांत्रिक नेपाळची स्थापना केली. २३ जुलै, २००८ रोजी राम बरन यादव यांनी नेपाळचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

राजधानी व सर्वात मोठे शहर :काठमांडू
अधिकृत भाषा :नेपाळी
राष्ट्रीय चलन :नेपाळी रुपया (NPR)

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*