पुणे -नगर महामार्गावर पुणे – कोरेगाव शिक्रापुरमार्गे रांजणगाव हे पुण्यापासून ५० किमी. अंतरावर आहे. येथे अष्टविनायकातील श्री महागणपतीचे मंदिर आहे.
मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे.
मूळ मूर्तीला “महोत्कट’ असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत.
हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला येथे मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते, त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची इथे रीघ लागलेली असते.
शिरूर आणि पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी एसटीची सोय आहे, तसेच नगरमार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावला उतरता येते.
रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराची वेबसाईट पहाण्यासाठी क्लिक करा
Leave a Reply