बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी रावेर

Raver - Birthplace of Bahinabai Chaudhari

रावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी…

मध्य प्रदेशच्या सीमेला खेटून असलेल्या या भागात लेवा पाटील समाजाचं प्राबल्य आहे. अहिराणी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कोसलाकार लेखक भालचंद्र नेमाडे यांची ही जन्मभूमी… मध्य प्रदेश जवळ असल्यानं इथल्या नागरिकांवर ब-हाणपूर, इंदोरचा पगडा आहे. मराठीसोबतच तावडी ही लेवा पाटील समाजाची बोलीभाषा हे या मतदारसंघाच वैशिष्ट.. वांग्याचं भरीत आणि वरण बट्टी या स्वादासाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर…. खान्देशात मोडणारा हा भाग महाराष्ट्रात आपली आगळीवेगळी  संस्कृती  टिकवून आहे ..

रेल्वेने हे शहर देशाशी जोडलेले असून, ते रेल्वेच्या भुसावळ विभागात येते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*