पालघर जिल्हा

Palghar District

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन निर्माण केलेला पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवा जिल्हा. अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा हा जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे. या जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासी लोकवस्तीचा असून बराचसा बाग अजूनही मागासलेला आहे. जिल्ह्यातील वसईची केळी व डहाणूचे चिक्कू राज्यात प्रसिद्ध आहेत.