मुंबई जिल्हा

Mumbai District

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्रासाठी मुंबई अत्यंत मोलाची आहे. १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडून महाराष्ट्राने मुंबई स्वत:कडे मिळवली.

मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय येथे आहे. सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ, माझगांव डॉक, आरे मिल्क कॉलनी, फिल्म सिटी, एस्सेलवर्ल्ड ही मुंबईची वैशिष्ट्ये.