गयाना

गयानाचे सहकारी प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनार्‍यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे.

युरोपीय शोधक १७व्या शतकात येथे दाखल झाले व इ.स. १६१६ साली डचांनी येथे पहिली वसाहत स्थापन केली. इ.स. १८१४ मध्ये हा भाग ब्रिटिशांनी ताब्यात घेतला व १८३१ साली तीन वसाहती एकत्रित करून ब्रिटिश गयानाची निर्मिती झाली. २६ मे १९६६ रोजी गयानाला स्वातंत्र्य मिळाले.

गयाना भौगोलिक दृष्ट्या जरी दक्षिण अमेरिकेमध्ये असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या तो कॅरिबियनचा भाग मानला जातो. बेटावर नसलेला तो एकमेव कॅरिबियन देश आहे तसेच इंग्लिश ही राष्ट्रभाषा असलेला एकमेव दक्षिण अमेरिकन देश आहे. जॉर्जटाउन ही गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गयाना राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :जॉर्जटाउन
अधिकृत भाषा :इंग्लिश
इतर प्रमुख भाषा :हिंदी भाषा
स्वातंत्र्य दिवस :२६ मे १९६६
राष्ट्रीय चलन :गयानीझ डॉलर

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*