मुंबईतील गिलबर्ट हिल टेकडी

Gilbert Hill in Mumbai

अमेरिकेतील डेव्हील्स टॉवरसारखी असलेली मुंबईतील गिलबर्ट हिल ही टेकडी ब्लॅक बेसॉल्ट या अति-कठीण दगडापासून बनली आहे. जगातील ही एकमेव कठीण अशी टेकडी आहे.

मुंबई शहरात अनेक ब्रिटिशकालीन वास्तू आणि किल्ले आहेत. मुंबईत मलबार हिल, माझगाव टेकडी, शिवडीची राम टेकडी, वरळीची टेकडी, पाली हिल यासारख्या टेकड्याही आहेत. यातल्या कित्येक टेकडया आता नामशेष झाल्या आहेत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातलीच एक म्हणजे अंधेरी येथील गिलबर्ट हिल ही टेकडी. अंधेरी पश्चिमेला नवरंग सिनेमा आणि भवन्स कॉलेजच्या परिसरात ही टेकडी आहे. या टेकडीमुळेच या परिसराला गिलबर्ट हिल हे नाव पडलंय. दोनशे मीटर उंच असलेल्या या टेकडीवर जायला पायर्‍या आहेत. मात्र तिच्या आसपासच्या परिसरावर झोपडयांचं अतिक्रमण झालेलं आहे.

या टेकडीला मोठा रंजक इतिहास असल्याचं सांगितलं जातं. मेसोझोइक कालखंडात पृथ्वीवर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून मोल्टेन नावाचा लाव्हारस बाहेर पडला. आणि तो जवळपास ५० हजार चौरस किलोमीटरवर पसरला. म्हणजे त्यावेळी हा लाव्हारस गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी पसरला. त्या ज्वालामुखीचा परिणाम पक्षी, प्राणी आणि वनस्पतीवर झाला. हा परिसर ओसाड झाला. नंतरच्या काळात इथे वन्य जीवांचं प्रस्थ वाढलं असावं. कारण १९५२ मध्ये केंद्र सरकारने फॉरेस्ट अ‍ॅक्ट अंतर्गत गिलबर्ट हिलला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलं. २००७ मध्ये काही भूगर्भशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन त्याच्या संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा द्वितीय श्रेणीचा जागतिक वारशाचा दर्जा दिला.

या टेकडीवर दुर्गामाता आणि गावदेवी अशी दोन मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांच्या पुढे उद्यान आहे.

गिलबर्ट हिलविषयी हा एक लघुचित्रपट……

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*