धुळे जिल्ह्यातील लोकजीवन

धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री या तालुक्यांतील डोंगराळ व वनव्याप्त प्रदेशांत आदिवासी बहुसंख्येने राहतात. आदिवासींची मोठी संख्या असलेला नंदुरबार जिल्हा धुळ्यापासून वेगळा करण्यात आला असला तरीही धुळे हा ‘आदिवासी बहुल’ जिल्हा आहे. येथील एकूण लोकसंख्येपैकी २५% लोक आदिवासी जमातींचे आहेत.
येथील भिल्ल ही आदिवासींची प्रमुख जात आहे. वंजारी, ठेलारी व फासेपारधी या भटक्या विमुक्त जमातींचे लोकही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहतात. धुळे जिल्ह्यात मराठी व अहिराणी बोली बोलल्या जातात. जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य (तमाशा) या लोककला प्रसिद्ध आहेत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*